शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:35 IST

पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत . सध्या ६४२ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले आहेत.

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर 

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर २०२० अखेर दरम्यान मुदत संपणाऱ्या, परंतु कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे रखडलेल्या तब्बल ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरूवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला असून अंतिम प्रभाग रचना दोन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत.डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. परंतु कोरोनामुळे १७ मार्च रोजी या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती.  राज्यातील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून शासनाने अनलॉक संदर्भात वेगवेगळे आदेश देखील जारी केलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबर पर्यंत सह्या करून निश्चित करावा. त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी प्रभाग रचनेची अंतीम प्रसिद्धी करण्यास सांगितले आहे.पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत सध्या ६४२ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले आहेत. गाव कारभार यांना निवडणुकांचे वेध लागले असून राज्य निवडणूक आयोगाने आता प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंचcorona virusकोरोना वायरस बातम्या