शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राजरोसपणे भाजपचा प्रचार करणा-या निवडणूक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 18:33 IST

मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा सर्व प्रकार घडला...

ठळक मुद्देसंबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे : कसबा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर भाजपचा राजरोसपणे प्रचार करणा-या निवडणूक अधिका-याला काँग्रेसच्याच पदाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. प्रभाग क्रमांक 188 मधील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तिथे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . हा प्रकार कळताच महापौर मुक्ता टिळक यांच्यासह उमेदवार मोहन जोशी यांनी केंद्राकडे धाव घेतली. त्या निवडणूक अधिका-याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा  सर्व प्रकार घडला. ते म्हणाले मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी राजेश भोसले हे मतदारांना  ‘भाजपला मतदान करा’ असे सांगत होते. शासकीय अधिका-याने असे सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हा अधिकारी सकाळपासूनच हे मतदारांना सांगत होता. ही बाब निर्वाचन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर उमेदवार मोहन जोशी इथे आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले. हे प्रकार होत असतील ही लोकशाहीची विटंबना आहे. अशाप्रकारे भाजपला निवडणूका जिंकायच्या असतील तर त्या निवडणूकीला काही अर्थ नाही.याप्रकरणी संबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले आहे.------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ भारतीय जनता पक्षाने कुठल्याही शासकीय अधिका-याला कुणाला मत द्या हे सांगण्यास सांगितले नाही. देशासाठी मतदान करा असे कोणतीही व्यक्ती कुणालाही सांगू शकते-महापौर मुक्ता टिळक -------------------------------------------------------------------------------गिरीश बापट शासकीय अधिका-यांमार्फत काँग्रेसला मत देण्यास अटकाव करतील हे आम्ही आधीच लक्षात आणून दिले होते. शासकीय अधिका-यांमार्फत भाजपचा प्रचार करणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सकाळपासूनच हे शहरातील अनेक मतदार केंद्रावर सुरू आहे. यात सर्व अधिकारी सहभागी आहेत- मोहन जोशी, कॉंग्रेस

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग