शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी व निवडणूक अधिका-यांमध्ये वादा-वादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 20:31 IST

काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेस निवडणुक : स्मार्ट कार्ड ग्राह्य न धरल्याने युवक संतप्तया वादामुळे काँग्रेस भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त तैनात

पुणे : युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे स्मार्ट कार्ड ग्राह्य धरणार नसल्याचे सांगितले. यामुळे मतदानासाठी आलेले युवक चांगले संतप्त झाले. मतदान प्रक्रियेचे साहित्य फेकून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादा-वादी झाली. पदाधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांना बोलवून पुढील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.     काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील अनेक भागात निवडणुका होत आहे. तर पुण्यात काँग्रेस भवन येथे दिलेल्या नियमावली नुसार दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे.या निवडणुकांचा बुधवार (दि.१२) अखेरचा दिवस असल्याने शहरातील अनेक भागातील काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस भवन येथे मतदान करण्यासाठी उपस्थित होते. निवडणुकीवेळी अधिकाऱ्यांकडून आधारकार्डची मागणी करण्यात आली. परंतु  कार्यकर्त्यांनी आधारकार्डचे स्मार्ट कार्ड दाखवले. निवडणूक अधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले नाही. आधार कार्ड असल्यावर मतदान करता येईल,असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.त्यावरून कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे स्वरूप हमरी तुमरीत झाले. टेबल आपटण्यात आले.अधिकाऱ्यांच्या हातातील टॅब हिसकावून घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया त्यानंतर थांबवण्यात आली आहे. दरम्यान या वादामुळे काँग्रेस भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.    याबाबत काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी काँगे्रसभवनमध्ये निवडणुकीत काही वाद झाले नाहीत. ठरल्याप्रमाणे मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliceपोलिस