शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:05 IST

अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. महिला, कार्यकर्ते यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ''महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही'' असा विश्वास भाषणातून व्यक्त केला आहे. 

फडणवीस म्हणाले,  उदघाटनाला आलेल्या नागरिकांची ही गर्दी पाहून भाजप महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मला अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. 

''कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.''  पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली 

''जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाही. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा