भरदिवसा घरात घुसून ज्येष्ठाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST2021-06-29T04:09:00+5:302021-06-29T04:09:00+5:30

बारामती: शहरात भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून सोनसाखळी हिसकावल्याची घटना शनिवारी (दि. २६) घडली आहे. या घटनेमुळे ...

The eldest enters the house all day | भरदिवसा घरात घुसून ज्येष्ठाची

भरदिवसा घरात घुसून ज्येष्ठाची

बारामती: शहरात भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून सोनसाखळी हिसकावल्याची घटना शनिवारी (दि. २६) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत येथील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेमागे वास्तव्यास असणाऱ्या ७७ वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ नागरिकाच्या घरात एक तोंडओळख असलेली ३५ वर्षीय महिला आली होती. तिने दौंडला जाण्यासाठी ५० रुपये देण्याची मागणी केली. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असे ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. त्यानंतर पाच मिनिटाने ती महिला पुन्हा एका युवकाला घेऊन तेथे आली. त्यावेळी आमची फलटण रस्त्यावर २ ते ३ गुंठे जागा विकायची आहे, असे तिने सांगितले. त्यावर उद्या जाऊन जागा बघू, असे सांगत त्या महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आाणि युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. यात अर्धी साखळी त्याच्या हाती आली.तर उर्वरित अर्धी सोनसाखळी गळ्यात तशीच राहिली. त्यानंतर दोघांनीही तेथून धूम ठोकली.

Web Title: The eldest enters the house all day