शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

PMC Division: एकनाथ शिंदेंची राजकीय खेळी; पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी - उरुळीसाठी नवीन नगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:31 IST

गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या.

पुणे : पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेमधून वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. येत्या दोन आठवड्यांत यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे होती. या दोन गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम पालिकेकडून सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे, तसेच पालिकेच्या वतीने या गावांमध्ये तीन टीपी स्कीमदेखील राबविण्यात येत आहे. गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महापालिका सुविधा देत नसल्याने ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली.

होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.

पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार पुणे महापालिकेमध्ये ११ गावे आणि त्यानंतर पालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरली होती; पण आता ही दोन गावे वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख आहे. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार आहे.

नागरिकांना दिलासाफुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांकडून पालिका मोठ्या प्रमाणात कर आकारणी करीत होती. पालिका नागरिकांकडून अक्षरश: जिझिया कर वसूल करीत होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता नगरपालिका झाल्यामुळे नागरिकांना मिळकत कर कमी होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीला फटकाहडपसर महापालिका करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मागे पडली आहेत. आता ही गावे वगळल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. पालिकेच्या प्रभागरचनेत या गावांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता.

नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी नगरपालिकेच्या माध्यमातून उरुळी देवाची, फुरसुगी गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. पुणे महापालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कचरा प्रकल्प या दोन गावांतचपुणे महापालिकेचे उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांत अनेक कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन, तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य केले जाईल, असे या गावातील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे