शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वाइन फ्लूचा आठवा बळी

By admin | Updated: March 2, 2015 03:16 IST

स्वाइन फ्लूचा शहरातील आठवा बळी शनिवारी गेला आहे. खडकी येथील ५५ वर्षांची महिला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात आजाराने मरण पावली.

पिंपरी : स्वाइन फ्लूचा शहरातील आठवा बळी शनिवारी गेला आहे. खडकी येथील ५५ वर्षांची महिला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात आजाराने मरण पावली. मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे वैद्यकीय अहवालावरुन उघड झाले. अतिया उस्मान शेख (रा. बंगला नंबर ३५, डंकन रोड, खडकी) हे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. २५ तारखेला त्यांना थेरगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांना कृत्रिम श्वसनोपचार सुरू करण्यात आले. त्याच दिवशी रात्री साडेअकरालात्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या थुंकीचे नमुने त्याच दिवशी राष्ट्रीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दोन दिवसांनी २८ तारखेला त्यांना एच १ एन १ ची लागण होऊन स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल आला. दिनांक १ जानेवारीपासून स्वाइन फ्लूची लागण सुरू झाली आहे. या आजाराने २१ जानेवारीला पिंपळे गुरव येथील ४१ वर्षांच्या व्यक्तीचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू थेरगावच्या खासगी रुग्णालयात झाला. जानेवारी महिन्यात दोघांचे बळी या आजाराने घेतले. फेब्रुवारीत आजाराची तीव्रता वाढत गेली. एकूण ६ जणांचा मृत्यू याच महिन्यात झाला. १ तारखेला स्वाइन फ्लूने दोघांचे बळी घेतले. आंध्रप्रदेश येथील ४८ वर्षांच्या नागरिकांचा भोसरीतील खासगी रुग्णालयात आणि पिंपळे निलख येथील ४० वर्षांच्या व्यक्तीचा पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ तारखेला चिंचवडच्या ३४ वर्षीय तरुणाचा आजाराने मृत्यू १३ तारखेला वायसीएममध्ये झाला. तीन दिवसांनी १८ तारखेला वायसीएममध्ये खेड तालुक्यातील मरकळ येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला. थेरगाव येथील खासगी रुग्णालयात मोहननगर, चिंचवड येथील ५९ वर्षांच्या व्यक्तीचा उपचार दरम्यान अंत झाला. महिन्याच्या शेवटच्या दिवशी खडकीतील अतिया शेख यांचा मृत्यू झाला. शहरातील रुग्णालयात मृत्यू झालेली ही संख्या आठवर पोहचली आहे. आजाराने बळी ठरलेल्या ८ पैकी २ महिला होत्या. गेल्या सोमवारी (दि. २३) पिंपरीतील ४५ वर्षांच्या एका महिलाचा मृत्यू पुण्यातील खासगी रुग्णालयात झाला. रविवारी १२ जणांना टॅमिफ्लू औषधे रविवारी एकूण १२ जणांना टॅमिफ्लू औषधे दिली गेली. एका रुग्णाच्या थुंकीचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी २५९ जणांची बाह्य रुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. त्यातील ११४ जणांवर सर्दी, खोकला, ताप आजारासंबंधित उपचार करण्यात आले. १ जानेवारीपासून रविवारपर्यंत एकूण १२३ जणांना एच १ एन १चा संसर्ग होऊन स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पोषक वातावरणामुळे उद्रेक :एन १ एन १ विषाणूचा संसर्ग होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याने जानेवारीपासून त्याचा उद्रेक झाला. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत असेच वातावरण होते. काही दिवस तापमानात वाढ झाल्याने हा संसर्ग कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शनिवारी अचानक वातावरण ढगाळ होऊन सायंकाळी पावसाने हजेरी लावली. स्वाइन फ्लूचा धोका आणखी वाढेल, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)