शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दुरावलेल्या " त्या " मायलेकी भेटल्या अठरा दिवसांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:32 IST

आई होती बाधित, बाळ घरी

ठळक मुद्देससून रुग्णालयात प्रसुती इकडे आईचा कोरोनाशी लढा सुरू तर दुसरीकडे मुलीला भेटण्याची आस

पुणे : ती प्रसुतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झालेली... पण सासूला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचीही चाचणी घेतली. त्यात तिलाही लागण झाल्याचे कळले... त्याच दिवशी तिने मुलीला जन्म दिला...बाळाच्या चाचणीत ते कोरोनामुक्त होते, पण कोरोनाच्या घट्ट विळख्याने आई आपल्या काळजाच्या तुकड्याला एकदाच डोळे भरून पाहू शकली. तर मुलगीही आईच्या वात्सल्यापासून दुरावली. आई कोरोनामुक्त झाल्यानंतर १८ दिवसांनी या मायलेकीची भेट झाली.पर्वती दर्शन येथे राहणारी एक २६ वर्षीय गर्भवती महिला प्रसुतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्यादिवशी तिच्या सासूलाही कोविड रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. सासूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपकार्तील नातेवाईंचा शोध सुरू झाला. तेव्हा सुनेला याच रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लगेच सुनेचीही चाचणी घेण्यात आली. प्रयोगशाळा अहवालात दि. १६ एप्रिलला तिला कोरोना विषाणुचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत तिची प्रसुती झाली होती. सुमारे अडीच किलो वजनाच्या गोंडस मुलीला जन्म दिला होता. डॉक्टरांनी तातडीने मुलीचीही कोरोना चाचणी केली. सुदैवाने आईकडून बाळाला संसर्ग झाला नव्हता. पण बाळ आईकडे दिले असते तर बाधित झाले असते. म्हणून बाळाला प्रसुतीनंतर लगेच लहान मुलांच्या वॉर्डमध्ये नेण्यात आले. तिथे बाळाला पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातील मिल्क बँकेतील दुध दिले गेले. मुलीची प्रकृती ठीक असल्याने चार दिवसांनी तिला नातेवाईकांकडे सोपवून घरी पाठविण्यात आले.इकडे आईचा कोरोनाशी लढा सुरूच होता. तर दुसरीकडे मुलीला भेटण्याची आस होती. एक-एक दिवस पुढे सरकत होता. अखेर कोरोनाशी सुरू असलेला आईचा लढा मंगळवारी (दि. ५) संपला. सलग दोन्ही दिवस तिचे कोरोना संसर्गाचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी तिला घरी सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. त्यानंतर १८ दिवसांच्या दुराव्यानंतर दोघी मायलेकींची भेट झाली.---------------आई कोरोनामुक्त झाली असली त्यांना आवश्यक दक्षता सांगितले आहे. बाळाजवळ जाताना तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुवणे, घराबाहेर न पडणे आदी काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच बाळाला दुध देण्यात काही अडचण नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस