शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

आठ हजार सातबारे कालबाह्य, पुणे शहरातील विशेष मोहीम, केवळ प्रॉपर्टी कार्डच राहणार अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:24 AM

नगर भूमापन (सिटी सर्व्हे) करताना झालेल्या घरांच्या आणि जमिनींच्या मोजणीदरम्यान मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात आले होते. हे प्रॉपर्टी कार्ड देताना पुणे शहरातील आठ हजार सातबारा उतारे तसेच ठेवण्यात आलेले होते.

- लक्ष्मण मोरेपुणे : नगर भूमापन (सिटी सर्व्हे) करताना झालेल्या घरांच्या आणि जमिनींच्या मोजणीदरम्यान मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात आले होते. हे प्रॉपर्टी कार्ड देताना पुणे शहरातील आठ हजार सातबारा उतारे तसेच ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे जमिनींचे मालक सोयीनुसार सातबारा अगर प्रॉपर्टी कार्डचा करत असून, यामुळे जमिनींच्या व्यवहारामध्ये घोळ निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही काही प्रमाणात बुडत असल्याचे समोर आल्याने हे सातबारा उतारे रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ही दुहेरी पद्धत बंद करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १२२ अन्वये गावठाण अथवा आसपासच्या नागरीवस्तीचे सिटी सर्व्हे करण्यात आलेले आहेत. गावठाणातील घरांची, मालमत्तांची आणि जमिनींची मोजणी करुन त्याचे नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यात आलेली आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी घरोघरी जाऊन नोंदवहीमध्ये संबंधितांची माहिती भरणे आणि त्याबाबतचे निर्णय घोषित करणे अशी कामे करण्यात आली आहेत. या मोजणीदरम्यान बिगरशेती, गावठाण आणि शेती असे शेरे असलेले मालमत्ता पत्रक संबंधितांना देण्यात आले होते. हे मालमत्ता पत्रक देताना मूळ सातबारा उतारे रद्द न करता तसाच ठेवण्यात आलेले होते.शेती असा शेरा असलेले पुणे शहरातील आठ हजार सातबारा उतारे अद्यापही अस्तित्वात असल्याचे भूमी अभिलेख व जमाबंदी कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. यातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतजमिनी या बिगरशेती (एनए) झालेल्या असून या जागांचे विकसन झालेले आहे. वास्तविक नगर भूमापन कार्यालयाकडे अर्ज करुन हे सातबारा उतारे रद्द करणे आवश्यक होते.मात्र, जमीनमालकांनी स्वत:च्या फायद्याकरिता सोयीनुसार सातबारा उतारे व मालमत्ता पत्रकांचा वापर करायला सुरुवात केली. दोन्ही कागदपत्रांचा वापर करुन जमीन बळकावण्याचे अथवा बेकायदा व्यवहारांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे जमिनींच्या व्यवहारात अनियमितता आली आहे. वाद-विवाद सुरु झाल्याने जमिनी कायदेशीर पेचात अडकल्या. अशा जमिनींचे दर कमी करून खरेदी केली जाऊ लागली.फसवणुकीचे प्रकार वाढले : पोटहिस्से प्रॉपर्टी कार्डावर लावणारअनेक जमीनमालकांनी सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड दाखवत कर दुसरीकडे भरल्याचे सांगून शासनाची फसवणूक केल्याचीही उदाहरणे समोर आली.यासोबतच विकसनासाठी जमीन देताना साताबारा देणे अथवा प्रॉपर्टी कार्ड देणे आणि दुसरीकडून दुसºया कागदपत्राद्वारे व्यवहार करणे असे प्रकारही घडू लागल्याने फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.- राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दुहेरी कागदपत्रे असलेले आठ हजार सातबारा उतारे या मोहिमेमध्ये रद्द करण्यात येणार आहेत.या जमिनींच्या वाटण्या झाल्या असतील तर मोजणी करून त्याचेपोटहिस्से करून संबंधितांची नावे या प्रॉपर्टी कार्डवर लावली जाणार आहेत.- १९९० मध्ये शासनाने ही दुहेरी पद्धत बंद करण्यासंदर्भात परिपत्रक काढले होते.- २०११ मध्ये पुन्हा हे परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे