जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या

By Admin | Updated: October 2, 2014 23:46 IST2014-10-02T23:46:30+5:302014-10-02T23:46:30+5:30

जिल्हाभरात 8 हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत.

Eight thousand ink bottles will be required in the district | जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या

जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या

>अमोल जायभाये - पिंपरी
जिल्हाभरात 8 हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत. एक शाईची बाटली 35क् ते 4क्क् मतदारांना पुरते. मात्र, मतदानाच्या दिवशी कमतरता पडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जात आहे, 
अशी माहिती निवडणूक 
अधिका:यांनी दिली. 
मतदान करण्यापूर्वी डाव्या हाताच्या बोटाच्या नखाला शाई लावण्यात येते. ही त्या व्यक्तीने मतदान केल्याची ओळख असते. ही शाई पुसणो सध्या तरी शक्य नाही. शाई बोटावर दिसत असताना कोणी मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. शाई बोटाला लावल्यानंतर ती किमान तीन आठवडे तरी पुसत नाही. 
 मतदान करताना डाव्या हाताच्या बोटाला लावण्यात येणारी गडद निळ्या रंगाची शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अॅण्ड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीद्वारे बनविण्यात येते. सन 1962 पासून या कंपनीद्वारे उत्पादित करण्यात येणा:या शाईचा वापर मतदान केंद्रावर केला जातो. निवडणूक विभागाच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी व नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनआरडीसी) विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जाते. 
 
..तर बोटाला होऊ 
शकते इजा
या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट या घातक रसायनाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या निळ्या रंगाला चकाकी येते. ही शाई केमिकलने पुसण्याचा प्रयत्न केल्यास बोटाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. 
परदेशातही भारतीय शाईला मागणी
भारतात निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ही शाई पाकिस्तान, अफगाणिस्थान, कॅनडा, नेपाळ, कंबोडिया, तुर्की, घाना, डेन्मार्क, नायजेरिया, साऊथ आफ्रिका, मंगोलिया, मलेशिया, सिंगापूर आदी देशांमध्येही 
वापरली जाते. 
 
मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई तीन आठवडय़ार्पयत पुसता येत नाही. ही शाई पुसण्यासाठी बाजारात कोणत्याही प्रकारचे केमिकल उपलब्ध नाही. 
समीक्षा चंद्रकार-गोकुळे
उप जिल्हा निवडणूक अधिकारी 

Web Title: Eight thousand ink bottles will be required in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.