लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST2021-06-05T04:09:47+5:302021-06-05T04:09:47+5:30
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वेमार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ...

लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ पोलीस निलंबित
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वेमार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रुपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १२० कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जि. कुलू) आणि कौलसिंग रूपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलू) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे होता. त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यानंतर एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढेदेखील कारवाई केली होती.