कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये चार सोसायटीतील आठ फ्लॅट फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:14+5:302020-12-22T04:11:14+5:30

पुणे : कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील ४ सोसायट्यातील ८ फ्लॅटवर चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेली. ...

Eight flats belonging to four societies were blown up in Lullanagar in Kondhwa | कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये चार सोसायटीतील आठ फ्लॅट फोडले

कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये चार सोसायटीतील आठ फ्लॅट फोडले

पुणे : कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील ४ सोसायट्यातील ८ फ्लॅटवर चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेली.

याप्रकरणी अशोक भोई (वय २६, रा.गुरूनानक नगर भवानीपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरिस्टो क्रॅट सोसायटी, अलिशान कार्नर, क्लासिको बंगलो, सोना हौसिंग सोसायटी या सोसयिटीत या घरफोड्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोई यांचे मामा बाबु बोयन यांचे आरिस्टो क्रॅट सोसायटीच्या पार्किंगमधील फ्लॅट क्रमांक दोन चा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ४२ हजारांचा ऐवज चोरी केला. तर सोना हौसिंग सोसायटीतील अमिन्नुद्दीन शेख यांच्या फ्लॅट नंबर सात मधील २५ हजार रुपये किंमतीची अंगठी चोरी केली. तसेच क्लासिका बंगलो प्लॉट नंबर ११० मधून ५ हजार रुपयांची रोकड असा ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला. यावेळी चोरट्यांनी आरिस्टो क्रॅट सोसायटीमधील ३ फ्लॅट, अलिशान कॉर्नरमधील एक व सोना हौसिंग सोसायटीतमील दोन फ्लॅटचा कडी कोयंडा उचटून चोरीचा प्रयत्न केला. दरम्यान हा सर्व प्रकार सोसायटीतील कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

Web Title: Eight flats belonging to four societies were blown up in Lullanagar in Kondhwa