मल्लाव खूनप्रकरणी आरोपींना आठ दिवसांची कोठडी

By Admin | Updated: September 3, 2016 03:11 IST2016-09-03T03:11:33+5:302016-09-03T03:11:33+5:30

नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी काल (दि. १) अटक केलेल्या कुर्लप बंधूंना शुक्रवारी शिरूर न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Eight-day remand of accused in murder case | मल्लाव खूनप्रकरणी आरोपींना आठ दिवसांची कोठडी

मल्लाव खूनप्रकरणी आरोपींना आठ दिवसांची कोठडी

शिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी काल (दि. १) अटक केलेल्या कुर्लप बंधूंना शुक्रवारी शिरूर न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी मुख्य सूत्रधार नीलेश ऊर्फ नानू कुर्लप व गणेश कुर्लप या बंधूंना अटक केली. या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रथम अटक करण्यात आलेल्या आरोपींना ९ सप्टेंबरपर्यंत (१० दिवस) पोलीस कोठडी सुनावली होती. खुनाच्या घटनेनंतर दोन दिवसांनी व्यवहार पूर्ववत झाले. मात्र, शांत शिरूरकर अद्याप या घटनेच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. या प्रकरणाचा जलद गतीने निकाल लागावा तसेच आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी मल्लाव यांच्या पत्नी संगीता मल्लाव सातत्याने करीत आहेत. मल्लाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या (दि. ३ सप्टेंबर) संध्याकाळी ५ वाजता नगर परिषदेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Eight-day remand of accused in murder case