शिक्षण संस्थांची ‘शाळा’
By Admin | Updated: July 11, 2014 23:20 IST2014-07-11T23:20:09+5:302014-07-11T23:20:09+5:30
2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे.

शिक्षण संस्थांची ‘शाळा’
बारामती : 2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे. मात्र, बारामती तालुक्यातील शिक्षण संस्थांची ‘शाळा’ उघडकीस आली आहे. 17 शाळांमध्ये 25 टक्के कोटय़ातील मोफत शाळाप्रवेश अद्याप दिलेले नाहीत.
या संस्थांनी शासनाच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालामुळे उघड झाला आहे. जवळपास या कोटय़ातील 5क् टक्के जागा रिक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अध्यादेशानुसार एकूण प्रवेशक्षमतेच्या 25 टक्के प्रवेश समाजातील वंचित, दुर्बल, अपंग विद्याथ्र्याना मोफत देण्याचा आदेश आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अजूनही प्रवेश दिले गेले नाहीत.
मएसोच्या सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, बारामती शाळेच्या 25 टक्के कोटा भरण्याच्या प्रक्रियेवरच शिक्षण विभागाने आक्षेप घेतला आहे. त्याची रीतसर चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी सांगितले.
एकूण अपेक्षित 421 प्रवेशांपैकी आतार्पयत फक्त 261 प्रवेश झाले आहेत. या मोफत प्रवेशासाठी शाळांना दोन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी देण्यात आला होता. फेब्रुवारी 2क्14पासून जून 2क्14र्पयत हा कालावधी होता. मात्र, या कालावधीत प्रवेशक्षमता असतानाही प्रवेश दिले गेले नाहीत. त्यांना हे प्रवेश देणो बंधनकारक असल्याने ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचे पालन न केल्यास शाळांना मिळणा:या अनुदानावर परिणाम होऊ शकतो.
मात्र, बारामती तालुक्यातील या शाळाच्या अडमुठय़ा धोरणामुळे अनेक गरीब विद्याथ्र्याचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याची खंत पालकांना आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सक्तीच्या शिक्षणालाच संस्थाचालक हरताळ फासत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
4विद्या प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यामिक शाळा, सीबीएसई, विद्यानगरी (3क्-6-24),
4ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, चौधरवाडी
(2-1-1),
4विद्या प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल 25-9-16),
4ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल
(4-क्-4),
4सिद्धेश्वर पब्लिक स्कूल, को:हाळे बुद्रुक
(19-9-1क्),
4विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सोमेश्वरनगर
(2क्-11-9),
4सह्याद्री पब्लिक स्कूल, खंडोबाचीवाडी
(15-2-13),
4ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल, क:हावागज,
(7-2-5),
4सरस्वती इंग्लिश
मीडियम स्कूल, देवतानगर
(1क्-6-4),
4सरस्वती विद्या मंदिर, देवतानगर
(1क्- 3 -7),
4विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर, पिंपळी
(25-1-24),
4पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बांदलवाडी
(32-21-11),
4एसव्हीपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, माळेगाव बुद्रुक
(2क्-6-14),
4जनहित प्रतिष्ठान, प्राथमिक शाळा, बारामती
(9-क्-9),
4एमईएस इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती (1क्-1-9),
4मएसो पूर्व प्राथमिक विभाग, बारामती
(2क्-16-4).