शिक्षण सल्लागार समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:12 IST2021-08-23T04:12:28+5:302021-08-23T04:12:28+5:30

लासुर्णे : महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व पाटीलवस्ती (लासुर्णे, ता. इंदापूर) शाळेचे मुख्याध्यापक ...

On the Education Advisory Committee | शिक्षण सल्लागार समितीवर

शिक्षण सल्लागार समितीवर

लासुर्णे : महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व पाटीलवस्ती (लासुर्णे, ता. इंदापूर) शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव बापूराव काळे यांची शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी इंदापूर तालुका शिक्षण सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून निवड केली आहे. काळे यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या सेवेमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याने त्यांना यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांनी गौरविले आहे. पाटीलवस्ती (लासुर्णे), तसेच टकलेवस्ती (लासुर्णे) सारख्या भटक्या वैदूसमाजातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मुलांची भटकंती १०० टक्के थांबवून त्यांना दर्जेदार शिक्षण दिल्याने आज हा समाज सर्वार्थाने समृद्ध झाला आहे. शिक्षण सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून काळे यांची जिल्हाधिकारी यांनी निवड केली आहे.

दिलीप काळे

२२०८२०२१-बारामती-०९

Web Title: On the Education Advisory Committee