सायकली धूळ खात
By Admin | Updated: June 27, 2014 00:35 IST2014-06-27T00:35:34+5:302014-06-27T00:35:34+5:30
गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सातवी ते दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत सायकल वाटपाचा निर्णय झाला.

सायकली धूळ खात
>पुणो : गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सातवी ते दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत सायकल वाटपाचा निर्णय झाला. मात्र, दुस:या वर्षाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी पहिल्या वर्षातील सायकलवाटप रखडले आहे. साधारण 990 सायकलींचे वाटप पूर्ण झाले असून, दीड हजार सायकली धूळ खात पडल्याची माहिती पुढे आली आहे.
महापालिकेच्या 2क्13-14 च्या अर्थसंकल्पात सायकलसाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या सातवी ते दहावीतील जे विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावरून शाळेला येतात, त्या विद्याथ्र्याना मोफत सायकल देण्यात येतील; पण संबंधितांना बसचा मोफत पास घेता येणार नाही, अशी योजना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अर्थसंकल्पात मांडली होती. परंतु, गेल्या वर्षाचे शैक्षणिक वर्षे संपत आल्यानंतर स्थायी समितीने निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वाटप रखडले होते. त्यानंतर सातवी व दहावीतील विद्याथ्र्याचे निकाल
लागून इतर खासगी शाळा
व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया
सुरू झाली. आता इतक्या उशिरा सायकल योजनेचा लाभ विद्याथ्र्याना कसा देणार? अशी शंका उपस्थित केली होती.
अखेर स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे यांनी पूर्वी अर्ज केलेल्या 2522 विद्याथ्र्याना सायकल वाटपाचा निर्णय घेतला. परंतु, नवीन
शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यानंतरही विद्याथ्र्याना सायकलवाटप झालेले नाही. आतार्पयत केवळ 99क् सायकलींचे वाटप झाले असून, अद्याप दीड हजार सायकली संबंधित शाळेत धूळ खात पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणली आहे. (प्रतिनिधी)
शाळेचे नावशिल्लक सायकली
गेनबा मोङो शाळा, विद्यानगर55
माध्यमिक विद्यालय, कात्रज85
सावित्रीबाई फुले शाळा, भवानी पेठक्2
गणपतराव गोळे शाळा, गोखलेनगरक्4