शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात चारा डेपो व टँकर सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:00 IST

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावांमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे ...

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावांमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टँकर व चारा डेपो सुरू करावेत, आदी मागण्यांचे निवेदन या भागातील नागरिकांनी सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांना दिले.

आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली लोणीच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, अशोक आदक पाटील, बाळशीराम वाळुंज, सचिन जाधव, संतोष कुरुकुटे, पहाडदऱ्याचे उपसरपंच पोपट वाघ, रामनळ्याचे उपसरपंच राजेंद्र सिनलकर, मनोज तांबे, भीमाजी आदक, गणपत सिनलकर यांनी उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी बोलताना अनिल वाळुंज म्हणाले, की यावर्षी तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, वाळुंजनगर, रानमळा व खडकवाडी परिसरात तीव्र दुष्काळ पडला आहे. विहिरी, बंधारे, पाझर तलाव कोरडे पडले आहेत.शेतातील पिके जळू लागली आहेत. त्यामुळे डिंभा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करावा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, यावर्षी दोन्ही हंगामातील पिके वाया गेल्याने शेतीसाठी घेतलेली कर्जे माफ करावीत, कृषिपंपाची वीजबिले माफ करावीत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, रोजगार हमीची कामे सुरू करून रोजदारांस प्रतिदिन ५०० रुपये मजुरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.शासनाने आंबेगाव तालुक्याला मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाच्या यादीत घेतले आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर ते त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जातील. मांदळेवाडीचा टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवला आहे. चारा डेपोबाबत शासनाच्या कोणत्याच सूचना अद्याप प्राप्त नाहीत. तरीही चारा मागणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतील. शासननिर्णयानुसार दुष्काळी तालुका म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.-अजित देशमुख,उपविभागीय अधिकारी 

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळ