शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात जाणवले भुकंपाचे धक्के; प्रशासनाकडून गावांना भेट, ग्रामस्थांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:55 IST

स्थानिक तहसीलदारांनी धक्का जाणवलेल्या गावांना भेट देऊन लोकांशी चर्चा केली....

घोडेगाव (पुणे) : घोडेगाव व परिसरात पहाटे साडेचार वाजता व दिवसभरात दोनवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोक रस्त्यावर येऊन थांबले होते; मात्र कुठेही नुकसान झाल्याची बातमी नाही. स्थानिक तहसीलदारांनी धक्का जाणवलेल्या गावांना भेट देऊन लोकांशी चर्चा केली.

पहाटे झोपत हे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पासरले. याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना अनेक ग्रामसथांनी कळविले. त्यांनी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना गावांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चिंचोली गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन जाणवलेल्या धक्क्यांची माहिती लोकांकडून समजून घेतली. 

यावेळी तहसीलदार नागटिळक यांनी सांगितले की, पहाटे जाणवलेल्या धक्क्यांबाबत पुणे वेधशाळेत चैकशी केली असता त्यांच्याकडे नोंद नाही. आंबेगाव तालुक्यात जाणवलेल्या धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी वेधशाळेशी संपर्क साधून याचा अभ्यास केला जाईल. भूकंपाचे धक्के ही नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये कोणाचे काही नुकसान झाले असल्यास प्रशासनाला कळवा, लोकांना घाबरून जाऊ नका, असे सांगितले.

घोडेगाव व परिसरात जाणवलेल्या धक्क्यांमुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. लागेल ती मदत केली जाईल. तसेच डिंभे येथे धरणाजवळ भूकंप मापक केंद्र आहे; मात्र येथे लाइट नसल्याने व यातील मशिन जुने झाल्याने हे बंद पडले आहे. येथे नवीन मशिन बसवून हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल व येथे पुन्हा नव्याने भूकंप मापक यंत्रणा सुरू केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांनी तहसीलदार नागटिळक यांना या धक्क्यांची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपPuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील