शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: गंगाधाम रोडवरील गॅरेजमधील वाहनांना पहाटे आग; १७ चारचाकी खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 09:35 IST

आग पहाटे ३:२० लागल्याची माहिती मिळाली यामध्ये गॅरेजमधील १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली....

कात्रज (पुणे) : शुक्रवारी पहाटेच्या वेळी गंगाधाम शत्रुंजय मंदिर रोडवर असणाऱ्या आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत असलेल्या एका गॅरेजला आग लागल्याची घटना घडली. आग पहाटे ३:२० लागल्याची माहिती मिळाली यामध्ये गॅरेजमधील १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची ४ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कोणीही जखमी नसून जिवितहानी देखील नाही. आगीचे नेमके कारण समजले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

या लागलेल्या आगेचे लोट खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे परिसरात धूर पसरला होता. पहाटेची वेळ असल्याने त्याचबरोबर रस्त्यावर गर्दी नसल्याने अग्निशमन यंत्रणा लवकर घटनास्थळी पोहचली व आग लवकर आटोक्यात आली. आगीमध्ये गॅरेजमधील एकूण १७ चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे  यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दल