शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

प्रत्येक भूमिका अलिप्तपणे करावी : दिलीप प्रभावळकर; पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:55 AM

महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुली अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिली. 

ठळक मुद्देदिलीप प्रभावळकर यांना ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान'दोनच अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या, एक महात्मा गांधी, दुसरी भा. रा. भागवत : प्रभावळकर

पुणे : चित्रपटासंबंधी मला जे काही प्रश्न पडतात. त्याची उत्तरं भूमिकेमध्ये मिळतात. कोणतीही भूमिका नटाने अलिप्तपणेच केली पाहिजे. नट म्हणून केलेल्या भूमिकेचा माणूस म्हणून तुमच्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो... उलट तो झाला नाही तर तुम्ही कोरडे नट राहाल, माणूस राहणार नाही... नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिहेरी कला प्रांतात मुशाफिरी करणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर अभिनयाचे अंतरंग उलगडत होते. महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. दिलीप प्रभावळकर यांना ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे संचालक भूपेंद्र कँथोला, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी किरण धिवार उपस्थित होते. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये वृद्धाश्रमातील एका वृद्धाची भूमिका मला आॅफर झाली होती. कसे ते माहित नाही पण  राजकुमार हिरानीला अचानक वाटले, की मी महात्मा गांधींची भूमिका करू शकतो. केस कापायला सांगितले. त्याच दरम्यान राम गोपाल वर्माचे बोलावणे आले. ‘शिवा’ चित्रपटात एका वाईट गृहमंत्र्याची भूमिका होती, जो मोठ्या गुंडाचा हस्तक असतो. रामला मी म्हणालो, की केस कापले आहेत. टोपी काढून त्याला दाखवले तर तो म्हणाला, असेच बारीक केस हवे आहेत. तासलेल्या डोक्याने हिंसा आणि अहिंसा असलेल्या भूमिका एकाचवेळी मी  केल्या...एका अष्टपैलू अभिनेत्याचे हे बोल  उपस्थितांना थक्क करून गेले. ‘कथा दोन गणपतरावांची’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर काम केलेले डॉ. मोहन आगाशे म्हणाले, की ‘बिकट वाट वहिवाट नाटकात दिलीपने अप्रतिम काम केले होते. त्याच्यासारखा विविध भूमिका केलेला महाराष्ट्रात दुसरा नट नाही. सहज म्हणून भूमिकेत शिरतो. तो अभिनेता म्हणूनच जन्माला आलाय. फक्त अध्येमध्ये तो माणूस असतो. कुतूहल वाटावे अस काम करतो. दिलीप म्हणजे निखळ आनंद आहे. आपण जे अनुभवतो ते त्याच्या नजरेतून पाहणे वेगळा अनुभव आहे, अशा शब्दातं प्रभावळकरांविषयी गौरवोद्गार काढले. आता तो पुण्यात आलाय, त्यामुळे आम्हाला स्पर्धक खूप आहेत, असा टोलाही त्यांनी मित्रवर्याला लगावला.   

अजरामर भूमिकाआयुष्यात दोनच अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या, एक महात्मा गांधी आणि दुसरी भा. रा. भागवत यांची. या व्यक्तिरेखा पडद्यावर उतरवताना तुम्हाला जशा त्या भावल्या तशा करण्याचे स्वातंत्र्य नसते, असे सांगून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील गांधी यांच्या भूमिकेचे अनुभव प्रभावळकर यांनी कथन केले. 

टॅग्स :Dilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर Mohan Agasheमोहन आगाशेbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला