दशक्रिया चित्रपटाचा ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो, हे आपल्याला पटत नाही - दिलीप प्रभावळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 11:24 PM2017-11-23T23:24:32+5:302017-11-23T23:30:36+5:30

दशक्रिया या चित्रपटात आपण स्वत: काम केलेले आहे. बाबा भांड यांच्या पुस्तकावर आधारलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो आणि चित्रपट न पाहताच विरोध केला जातो.

Do not you know that someone is boycotting a movie trailer of 'Dashkriya' - Dilip Prabhavalkar | दशक्रिया चित्रपटाचा ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो, हे आपल्याला पटत नाही - दिलीप प्रभावळकर

दशक्रिया चित्रपटाचा ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो, हे आपल्याला पटत नाही - दिलीप प्रभावळकर

Next

पणजी : दशक्रिया या चित्रपटात आपण स्वत: काम केलेले आहे. बाबा भांड यांच्या पुस्तकावर आधारलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ट्रेलर पाहून कोणीतरी बहिष्कार घालतो आणि चित्रपट न पाहताच विरोध केला जातो. हे आपल्याला पटत नाही, असे मत ख्यातनाम अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. 

बायोस्कोप व्हिलेजमधील कट्टय़ावर गुरुवारी रात्री मिना कर्णीक यांनी प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. चित्रपटात गरज असेल तरच आपण मेकअप करतो, अन्यथा आहे त्याच स्थितीत कॅमेरासमोर उभे राहत असल्याचे सांगत प्रभावळकर यांनी मुन्नाभाई एमबीबीएसमधील महात्मा गांधीची मिळालेल्या भूमिकेपासून, त्याचा मेकअप, त्यानंतर गांधिगीरीची आलेली लाट यावर त्यांनी प्रकाश टाकला.

राजकुमार हिराणी-विधू विनोद चोप्रा यांनी मुन्नाभाई एमबीबीएसची निर्मिती केल्यानंतर देशात काही काळ गांधिगीरीची लाट आली होती. संजय दत्तला म. गांधी यांची भूमिका आपण केल्याचे ज्यावेळी कळाले, तेव्हा त्याने मारलेली मिठी आजही आठवणीत राहते. याशिवाय आंध्र प्रदेशातील एका सरकारी कार्यालयात म. गांधी यांच्या प्रतिमेऐवजी माझी प्रतिमा भिंतीवर लावली, हे माध्यमांनी दाखविले तेव्हा मीही आश्चर्यचकीत झाल्याचे प्रभावळकर म्हणाले.

तेलगुमध्ये या चित्रपटाचा चिरंजीवी यांनी रिमेक केला. त्यात संजय दत्तची भूमिका प्रभुदेवा करीत होता. त्यांना म. गांधीच्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती मिळत नव्हती, तेव्हा चिरंजीवी यांनी विधू विनोद चोप्रा संपर्क साधला. त्यामुळे मला तेलगुमध्ये काम करायला मिळाले. तेव्हाही प्रभुदेवाही आपल्याला पाहिल्यानंतर विचारात पडला होता, याची आठवण त्यांनी सांगितली. भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणो’ या चित्रपटातील भूमिकेविषयी प्रभावळकर यांनी काही आाठवणी सांगितल्या. 

प्रभावळकर उवाच..

नाटक कसं लिहू नये याचा वस्तूपाठ ‘हसवा फसवी’ या नाटकाने घालून दिला आहे. या नाटकात सहा भूमिका साकारणो, हे आव्हान होते. लोकांना कंटाळा येईर्पयत ताणू नये, असे आपणास वाटते. त्यामुळे साडेसातशेच्या आसपास प्रयोग झाल्यानंतर ते करण्याचे आपणच थांबविले. ‘हसवा फसवी’ या नाटकाविषयी पु. लं. देशपांडे, श्रीराम लागू यांनी केलेले कौतुक कोणत्याही पुरस्कारांपेक्षाही मोठे वाटते.  ऋषिकेश गुप्तेचा ‘दिल दिमाग बत्ती’ हा आणि ‘मी शिवाजी पार्क’ हा महेश मांजरेकरांनी निर्माण केलेले आपले चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपट, नाटक करताना जेवढा तुम्हाला वेळ मिळतो, तेवढा वेळ मालिका करताना मिळत नाही. ब:याच दिवसांनी ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ ही मालिका दूरचित्रवाहिनीवर आली. तिला मर्यादा होत्या, म्हणून ती आपण केली. ‘चौकट राजा’मध्ये माझ्या वाटेला स्मिता तळवळकर यांच्या पतीची भूमिका होती आणि ‘नंदू’ची भूमिका परेश रावल करणार होते. पण ऐनवेळी मला ती भूमिका करावी लागली. 

राष्ट्रपतींनी ‘रमाबाई’म्हणून ओळखले!

 के. आर. नारायणन हे राष्ट्रपती असताना आम्ही ‘मिशन काश्मीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिल्लीत त्यांना भेटलो होतो. आपल्याबरोबर ऋतिक रोशन, संजय दत्त होता. विधू विनोद चोप्राने राष्ट्रपतींना ऋतिक आणि संजय दत्त यांची ओळख करून दिली. दोघांच्याही घरातील वातावरण चित्रपटाशी निगडित असल्याने त्यात काही वेगळे वाटण्यासारखे नव्हते. मात्र, विधू विनोद चोप्रा माझी ओळख कशी करून देणार, हा प्रश्न मला मनात सतावत होता. तेवढय़ात स्वत: राष्ट्रपतींनी तुम्ही रमाबाई का? अशी विचारणा केली. मी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपट पाहिला आहे, असे सांगितले. तेव्हा मला काही बोलताच येत नव्हते. रमाबाईने मला ओळख दिली, तशी ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील मंदाताईच्या (मंदाकिणी आमटे)भूमिकेनेही तेवढीच ओळख दिल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सांगितले. बायोस्कोपच्या कट्टय़ावर सचिन चाटे यांनी तिची मुलाखत घेतली. त्यात तिने मराठी, तेलगु, इंग्रजी, इराणी चित्रपटातील प्रवासाबद्दल माहिती उपस्थितांसमोर मांडली. 

Web Title: Do not you know that someone is boycotting a movie trailer of 'Dashkriya' - Dilip Prabhavalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.