शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:43 IST

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे

पुणे/धायरी : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. आणि ई बस सेवेचे शुल्क प्रति मानसी जाण्यासाठी 50 आणि येण्यासाठी 50 असे शंभर रुपये करण्यात आले आहे. तर वाहन तळ शुल्क दोन चाकीसाठी दहा रुपये आणि चार चाकीसाठी वीस रूपये असे करण्यात आले आहे. त्यानंतर पुणेकरांनी आनंदाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सिंहगडावर गर्दीही वाढू लागली होती. त्यातच आज सिंहगड पायथ्यापासून वर गडापर्यंत जाण्याचा रस्त्यात धक्कादायक घटना घडली आहे. 

 तीव्र उतारावरील वळणावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ई बस कठड्याला जोरदार धडकली. सुदैवाने बस कठड्याला अडकल्याने बसमधील प्रवासी बचावले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सिंहगडावरून बस खाली येताना घडला. सिंहगडावरून खाली कठड्याला लागून साधारण सातशेहून मिटरचे दरी आहे. बस मध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी सिंहगडावर गेलेल्या ई बस पैकी एक बस परत सिंहगडावरून खाली येताना पहिल्याच तीव्र उतारावरील वळणावर वळताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कठड्याला धडकली. सुदैवाने कठड्याला बस अडकल्याने सर्व प्रवासी बचावले. यावेळी बसमधून पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते. 

बस धडकली त्या कठड्याला लागून साधारण सातशेहून अधिक मीटरची दरी

ज्या कठड्याला बस धडकली त्या कठड्याला लागून साधारण सातशेहून अधिक मीटरची दरी आहे. गडावरून खाली उतरताना पहिले वळण तीव्र उताराचे आहे, तेथे वळताना बसला डावीकडे मागे- पुढे बस घेऊन चालवावी लागते.  सिंहगडावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने “माझा सिंहगड, माझा अभिमान' या मोहिमेंतर्गत वन विभाग आणि पीएमपीएमएलच्या वतीने सिंहगडावर जाण्यासाठी 1 मेपासून बससेवा सुरू केली. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने बस मध्ये क्षमेतपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने काही वेळा चढाला बस वर जात नाही.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPoliceपोलिसBus Driverबसचालकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात