शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिवसा हॉटेलात काम, रात्री शाळा अशी तारेवरची कसरत '' त्याने '' मिळविले ७७ टक्के गुण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 12:37 IST

लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यामुळे चिपळूणवरून रोजगाराच्या शोधात भावासह पुण्यात आला.

ठळक मुद्देरात्रशाळेतील गौरव नरवतला ७७ टक्के गुण

पुणे : ज्या वयात महाविद्यालयात मित्र-मैत्रिणींसोबत मौजमजा करायची, त्या वयातच त्याच्या खांद्यावर घरची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे दिवसभर हॉटेलमध्ये काम, तर रात्री शाळा करत गौरव मधुकर नरवत याने बारावीच्या परीक्षेत ७७.२३ टक्के मिळविले आहेत. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे  त्याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यामुळे चिपळूणवरून रोजगाराच्या शोधात भावासह पुण्यात आला. मोठ्या भावासोबत तो हॉटेलमध्ये काम करू लागला. शिक्षणाची असलेली आवड व कष्ट करण्याची जिद्द, या जोरावर त्याने घरची जबाबदारी पूर्ण करत, शिक्षण देखील सुरू राहावे म्हणून, पूना नाईट ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आज त्याने १२ वीपर्यंतचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे. पूना नाईट ज्युनिअर कॉलेजमधून त्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे.भविष्यात चार्टड अकाउंटंट (सीए) व्हायचे असल्याने तो वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. तसेच सीए होण्यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे श्रेय त्याने आई, मोठा भाऊ व शिक्षकांना दिले आहे. पूना ज्युनिअर कॉलेजच्या वतीने देखील त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. ज्युनिअर कॉलेजमधून दुसरा क्रमांक प्रथमेश दिलीप मोरे याने पटकाविला आहे. त्याला ७३.६९ टक्के गुण मिळाले आहेत. तो मूळचा कोकणातील असून पुण्याला मोबाईलच्या दुकानात काम करतो. शिक्षण हे अत्यंत मोलाचे असल्यामुळे १२ वीची परीक्षा तो यशस्वीरीत्या पास झाला आहे.  मुलींमधून पहिला क्रमांक रेखा जनार्दन सिरसाट हिने मिळविला आहे,  ७०.६१ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांचे (वय ३६) आहे. घरगुती कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, त्यामुळे पुन्हा आठवीपासून शिक्षण सुरू केले. चार मुलांचा अभ्यास घेऊन, तसेच दुकानात काम करून त्याने १२ वी परीक्षेचा अभ्यास केला. 

..............पूना नाईट ज्युनिअर कॉलेजचे एकूण ११४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कॉलेजचा निकाल ७२ टक्के लागला आहे. ..............नियमित शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल दिवसेंदिवस वाढत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो, ग्रामीण भागातील गरजू व शाळाबाह्य मुलांना वर्ग ८वी ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.- अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट ज्युनिअर कॉलेज............. 

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालhotelहॉटेलStudentविद्यार्थीSchoolशाळा