शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 18 कारखान्यांचे ऑक्सिजन प्रकल्प महिनाभरात, यंत्रसामग्रीचे पैसेही केले जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:03 IST

oxygen projects News: राज्यातील १८ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडे १२ कोटी ७० लाख रुपये जमा केले आहेत. रेडी टू यूज यंत्रसामग्री असलेले हे प्रकल्प महिनाभरात सुरू होऊन त्यातून किमान १५०० ऑक्सिजन सिलिंडर दररोज उत्पादित होतील.

पुणे : राज्यातील १८ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडे १२ कोटी ७० लाख रुपये जमा केले आहेत. रेडी टू यूज यंत्रसामग्री असलेले हे प्रकल्प महिनाभरात सुरू होऊन त्यातून किमान १५०० ऑक्सिजन सिलिंडर दररोज उत्पादित होतील. यातील धाराशिव साखर कारखान्याचा प्रकल्प सुरूही झाला आहे. त्यासाठी त्यांना २ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यांचीच क्षमता दररोज १००० ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याची आहे. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील हा एकमेव ऑक्सिजन प्रकल्प आहे.हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन त्यापासून वैद्यकीय कारणासाठीचा शुद्ध ऑक्सिजन या ‘रेडी टू यूज’ प्रकल्पांमधून तयार होतो. त्यासाठी विशिष्ट यंत्रसामग्री लागते. त्याचीच मागणी संबधित यंत्र उत्पादित करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडे या कारखान्यांनी नोंदवली आहे. धाराशिवचा प्रकल्प मोठा असला तरी अन्य कारखान्यांचे प्रकल्प ५० लाख ते दीड कोटी रुपये खर्चाचे आहेत. त्यापासून दररोज कमाल ९० व किमान ५० ऑक्सिजन सिलिंडर तयार होतील. 

साखर कारखान्यांनी परिसराच्या सामाजिक कामात नेहमीच सहयोग दिला आहे. कोरोना काळात त्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी स्पृहणीय आहे.-शेखर गायकवाड, साखर आयुक्त 

ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी नोंदवणारे खासगी व सहकारी साखर कारखानेnधाराशिव, विठ्ठलसाई, नॅचरल शुगर विठ्ठलसाई (तीनही उस्मानाबाद)nद्वारकाधीश (नाशिक),nपांडुरंग सहकारी (सोलापूर),nपूर्णा (हिंगोली),nभाऊसाहेब थोरात (संगमनेर)nशंकरराव काळे (कोपरगाव),nअजिंक्यतारा (सातारा),nदूधगंगा वेदगंगा (कोल्हापूर),nजवाहर सहकारी (हातकणंगले),nराजारामबापू (सांगली),nदत्त सहकारी (शिरोळ कोल्हापूर)nपराग ॲग्रो (शिरूर, पुणे),nश्रीनाथ म्हस्कोबा (पुणे),nबारामती ॲग्रो (बारामती, पुणे),nदत्त इंडिया (सांगली),nविठ्ठलराव विखे (प्रवरानगर,   अहमदनगर) आणि nव्यंकटेशकृपा शुगर (पुणे )

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनMaharashtraमहाराष्ट्र