शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

क्लोन कॉपी देण्यास सहा महिन्यांचा कालावधी, नऊपैकी दोघांना कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:08 AM

एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती.

पुणे : एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य केली; मात्र प्रत्यक्षात या क्लोनिंगची कार्यपद्धती प्रचंड वेळखाऊ असून, या खटल्यातील एकूण नऊ आरोपींपैकी केवळ दोन आरोपींनाच क्लोन कॉपी मिळाली आहे. उर्वरित आरोपींना क्लोन कॉपी मिळण्याकरिता किमान ६ महिन्यांचा कालावधी लागेल. अशी माहिती एल्गार प्रकरणातील आरोपींचे वकील राहुल देशमुख यांनी दिली.गुरुवारी एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी होती. या वेळी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, न्यायालय परिसरातील एका हॉलमध्ये क्लोन कॉपीचे काम सुरू होते. खटल्याशी संबंधित व्यक्ती व वकील यांनाच त्या हॉलमध्ये जाण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत देशमुख यांना अधिक विचारले असता ते म्हणाले की, ‘या प्रकरणातील ९ आरोपींनी क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार त्यांना क्लोन कॉपी देण्याचे काम सुरू झाले. या प्रकरणी एकूण १८ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस आहेत. प्रत्येक डिव्हाईसची क्लोन कॉपी तयार होण्यास ६ तासांचा अवधी लागतो. प्रत्येक डिव्हाईसची कॉपी ९ आरोपींमध्ये देण्याकरिता लागणारा वेळ प्रचंड आहे. याकरिता न्यायालयाकडे आरोपींच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतरही क्लोनिंगची प्रक्रिया सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नव्हती.’>वेळेची उपलब्धता पाहिल्यास यापुढे सहा किंवा वर्षभराचा काळ क्लोनिंग प्रक्रियेकरिता खर्ची पडेल, असे देशमुख यांनी सांगितले. एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी राहुल देशमुख, पार्थ शहा, सिद्धार्थ पाटील यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारElgar morchaएल्गार मोर्चा