हुजूरपागाने आकारले दुप्पट शुल्क

By Admin | Updated: June 3, 2015 04:49 IST2015-06-03T04:49:13+5:302015-06-03T04:49:13+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सर्वच खासगी शाळांना स्कूल बसचे पूर्ण शुल्क भरण्याची विनंती केली आहे. स्कूल बस प्रवास भाड्यात

Duplicate fees charged by Huzurpaga | हुजूरपागाने आकारले दुप्पट शुल्क

हुजूरपागाने आकारले दुप्पट शुल्क

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सर्वच खासगी शाळांना स्कूल बसचे पूर्ण शुल्क भरण्याची विनंती केली आहे. स्कूल बस प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, हुजूरपागा शाळा पालकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पीएमपीने केला आहे. पीएमपीच्या पत्रावरूनच शुल्कवाढ केल्याचे शाळेचे
म्हणणे आहे. दरम्यान, पीएमपी व शाळेतील विसंवादाचा फटका पालकांना बसणार असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
लक्ष्मी रस्त्यावरील हुजूरपागा शाळेने यंदा विद्यार्थ्यांना बस प्रवास शुल्क वाढविले. या कारणावरून पालकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला होता. मागील वर्षी विद्यार्थी वाहतुक शुल्क ५ हजार ५०० रुपये होते. या वर्षी १४ हजार ५०० रुपये इतके शुल्क निर्धारित केले आहे. त्यामुळे पालकांची संतप्त प्रतिक्रिया होती. मंगळवारी पालकांनी पीएमपी अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. या प्रसंगी पीएमपीचे संचालक विजय देशमुख, सरव्यवस्थापक राजेंद्र मदने, व्यवस्थापक अनंत वाघमारे उपस्थित होते. या वेळी स्कूल बस शुल्कवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पालकांनी केली.
मदने यांनी सांगितले, की एका बसमध्ये ६० विद्यार्थी असतात. त्यानुसार स्कूल बसला प्रति किमी ६५ रुपये प्रमाणे शुल्क निर्धारित करावे, असे अपेक्षित आहे.
या नियमानुसार हुजूरपागा शाळेकडून सुमारे ७ हजार रुपये शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. याबाबत पालकांनीच शाळेकडे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काच्या खर्चाबाबत विचारणा करावी. या मुद्द्यावर आम्ही बुधवारी दुपारी
शाळेत जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहोत. (प्रतिनिधी)

Web Title: Duplicate fees charged by Huzurpaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.