शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:12 IST

जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली.

ठळक मुद्देनारायणगावातील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, श्री प्रसाद कृषी सेवा केंद्र, बाविस्कर अ‍ॅग्रो दुकानांचा समावेशजुन्नर तालुक्यात राबविलेल्या मोहिमेंतर्गत ४५ कीटकनाशक केंद्रांची करण्यात आली तपासणी

पुणे : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली आहे.राज्य शासनाने बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवकांची विक्री न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नारायणगावातील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, श्री प्रसाद कृषी सेवा केंद्र आणि बाविस्कर अ‍ॅग्रो दुकानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ४५ कीटकनाशक केंद्रांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ६ कीटकनाशक उत्पादक कंपनीवर कारवाई उत्पादनांवर विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. अवैध कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी सन १९६८ आणि १९७१ अन्वये शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात आल्याचे खैरनार यांनी सांगितले.जिल्ह्यातील विविध कीटकनाशकांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील कीटकनाशकांचे उत्पादन साठवणुकीची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत ३१ कीटकनाशक विक्रीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्या कीटकनाशकांचे छापील मूल्य ६५, ४९ आणि ६६४ आहे. कीटकनाशकांची विक्री करताना सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध सूत्र प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कीटकनाशक वापरामुळे शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना विषबाधा होणार नाही. याबाबतची दक्षता कृषी विक्री दुकानदारांनी घ्यावयाची आहे. तसेच संबंधित कीटकनाशकांची संपूर्ण माहिती शेतकर्‍यांना देणे बंधनकारक आहे. अशी सूचना जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. विक्री केलेले कीटकनाशक, तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारसी केल्याव्यतिरिक्त जादा पिकाची लेबल शिफारस केली आहे. कीटकनाशक मंडळाने दिलेल्या नोंदणी परवानगीचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

 

.. तर परवाना निलंबनाची कारवाई जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी अधिकार्‍यांना कीटकनाशकांची साठवणूक करणार्‍या दुकानदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच, कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्‍यांनी घ्यावयाच्या आवश्यक काळजीच्या सूचना दुकानदारांनी देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे