९२ हजार ३८८ माती नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:21 AM2017-10-25T00:21:27+5:302017-10-25T00:21:44+5:30

बुलडाणा :  घटती शेती उत्पादकता व सिंचनाचा प्रश्न पाहता जमिनीच्या पोतानुसार शेतकर्‍यांना पीकपेरणी करता यावी, या दृष्टिकोणातून राज्यात राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ९२ हजार ३८८ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

9 2 thousand 388 soil pattern inspection | ९२ हजार ३८८ माती नमुन्यांची तपासणी

९२ हजार ३८८ माती नमुन्यांची तपासणी

Next
ठळक मुद्दे५.५0 लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण उत्पादकता वाढण्यास झाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  घटती शेती उत्पादकता व सिंचनाचा प्रश्न पाहता जमिनीच्या पोतानुसार शेतकर्‍यांना पीकपेरणी करता यावी, या दृष्टिकोणातून राज्यात राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ९२ हजार ३८८ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सोबतच गत तीन वर्षात पाच लाख ६0 हजार ३६७ मृद आरोग्य पत्रिकांचे जिल्ह्यात वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्हा हा राज्यात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. 
जिल्ह्यात २0१५-१६ या वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, जमिनीचे पोत कसे, कुठला घटक कमी किंवा जास्त आहे, हे समजण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका असणे अत्यंत गरजेचे आहे. ते समजल्यास पिकांना कोणत्या खताची मात्रा द्यावी, पीक पद्धतीत कोणती सुधारणा करावी, याचे शेतकर्‍यांना आकलन होणे सोपे होऊ जाते. पुणे येथील कृषी आयुक्तालयांतर्गत गेल्या दोन वर्षात नमुने काढणे आणि तपासणी करून आरोग्य पत्रिकांचे १00 टक्के वाटप करण्याच्या उद्दिष्टाची जिल्ह्यात परिपूर्ती झाली आहे.
यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, मृद नमुना घेतलेल्या ठिकाणच्या अक्षांश व रेखांश नोंदी घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४२0 गावात चार लाख ३0 हजार १८८ खातेदार असून, सहा लाख ५५ हजार 0५१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यापैकी जिरायत क्षेत्रातून ५६ हजार ४४४ नमुने तर ३५ हजार ८४४ नमुने बागायती जमिनीमधून तपासणीसाठी घेण्यात आले होते. २0१५-१६ मध्ये ५00 गावांची निवड करून त्यात ३0 हजार ९६६ नमुने तपासण्यात आले होते. त्यांतर्गत मेहकर तालुक्यात सर्वाधिक १९ हजार ६२३ पत्रिकांवितरीत करण्यात आल्या होत्या.
२0१६-१७ मध्ये ९३९ गावांतील ६२ हजार ५८३ नमुने तपासणीसाठी काढण्यात आले होते. तपासणींतर तालुका स्तरावर जिल्ह्यात चार लाख पाच हजार ८६३ मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक चिखली तालुक्यात ५८ हजार २0२ पत्रिकांचे वितरण करण्यात आले.

चालू वर्षात ६८८ गावातील नमुने घेतले
चालू वर्षात ६८८ गावांमधील ४४ हजार ७६४ मृद नमुने तपासणीचे उदिष्ट होते. त्यापैकी २४ हजार ७३३ नमुने तालुका स्तरावर काढण्यात आले होते. प्रयोगशाळेतून २१ हजार ३३६ नमुन्यांपैकी तीन हजरा ७७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून दहा हजार ३१४ मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी देऊळगाव राजा तालुक्यात चार हजार ६८८ पत्रिकांचे वितरण करण्यात आले.

विभागात जिल्हा अव्वल
तीन टप्प्यात ही योजना राबविण्यात येत असून, दोन वर्षांच्या पहिल्या टप्प्यात अमरावती विभागात जिल्हा अव्वल ठरला आहे. मृद आरोग्य पत्रिकेची ही योजना शेतकर्‍यांसाठी लाभदायी असून, जिल्ह्यातील शेतीची उत्पादकता वाढण्यास यामुळे मदत झाली आहे. कृषी निविष्ठांच्या खर्चामध्येही कपात झाली आहे. पत्रिकेत पिकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे आणि शेतीनुसार आवश्यक असणारी खते यांचा गोषवारा दिल्या जात आहे.

Web Title: 9 2 thousand 388 soil pattern inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती