शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:24 IST

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सध्या जिल्ह्यात जत्रा - यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठीचे अर्जांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी 16 अर्ज आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पहिली बैलगाडा शर्यत भरविण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व मावळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी असे दोन अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होते. राज्य आणि जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत म्हणून प्रचंड जय्यत तयारी देखील केली होती. परंतु दरम्यानच्या काळात पुणे जिल्हा आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आणि शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील 1 जानेवारी रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतींना स्थगिती दिली. आता आढळराव पाटील आणि सुनिल शेळके यांच्या स्थगिती दिलेल्या बैलगाडा शर्यती 11 आणि 12 फेब्रुवारीला होणार आहे.  त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील पहिली बारी होणार आहे. 

दरम्यान जिल्ह्यात सध्या जत्रा- यत्रांचा हंगाम सुरू झाला असून,  माघपौर्णिमेला 16 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान सहा- सात गावांमध्ये खंडोबाची यात्रा भरवली जाते. या सर्व ठिकाणी पारंपारीक पध्दतीनुसार बैलगाड शर्यत आयोजित केली जाते. या सर्व गावांसह अन्य गावांमधून देखील बैलगाड शर्यतसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आले आहेत. 

जाचक अटी कमी करा व स्थानिक स्तरावर परवानगी द्या 

''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बैलगाड शर्यतीला परवानगी देण्यात येत असली तरी यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत. तसेच परवानगीसाठी तहसिलदार,  पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी आठ-दहा दिवस जातात. याशिवाय परवानगीसाठी थेट पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे लहान-मोठ्या गावांना आवघड होऊन बसते. सध्या जिल्ह्यात जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू झाला असून,  या निमित्त पारंपारीक,  नवसाचे बैलगाड पळवले जातात. यासाठी शासनाने या जाचक अटी कमी करून स्थानिक स्तरावर परवानगी देण्याची सोय करावी असे राजेंद्र चव्हाण ( उपाध्यक्ष यात्रा समिती, वडज व गाडा मालक) यांनी सांगितले.''  

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतGovernmentसरकारAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारzpजिल्हा परिषद