शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुण्याला अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली उन्मळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:33 AM

रविवारी सायंकाळी काही ठिकाणी वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची; तसेच शेतक-यांची त्रेधा उडाली.

पुणे- जिल्ह्यात रविवारी सायंकाळी काही ठिकाणी वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची; तसेच शेतक-यांची त्रेधा उडाली. या पावसामुळे शेतकºयांनी काढणी केलेली पिके भिजल्याने त्यांचे नुकसान झाले, तर काहींना ते झाकून ठेवण्याची संधीही नाही. पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे आंब्यालाही मोठा फटका बसला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये सलग दीड ते दोन तास पडणाºया मुसळधार पावसामुळे जनावरांसाठी लागणाºया चाºयाचे नुकसान झाले आहे, तर काही प्रमाणात हिरड्यास जीवदान मिळाले आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण तयारझाले होते. अचानक साडेतीनच्यासुमारास पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस सलग दीड ते दोन ताससुरू होता. या भागामध्येआदिवासी बांधवांनी पुढील काळासाठी झाडावर जमिनीवर रचून ठेवलेले गवत भाताचा पेंढ्या भिजल्या. यामुळे त्यांचे नुकसान झाले. तर भातशेतीसाठी करण्यात आलेल्या कामांमध्ये व्यत्यय आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये नुकतीच भातशेतीच्या कामांसाठी सुरुवात झाली आहे.यामध्ये आदिवासी बांधव सर्वप्रथम भातखाचरांमध्ये मशागत करण्यासाठी भातरोपे पेरण्याच्या अगोदर खाचरांमध्ये राब भाजणी करतात. त्यासाठी भातखाचरांमध्ये जमीन सपाट केली जाते. यालाच आदिवासी पारंपरिक भाषेमध्ये रोमठा असे म्हणतात. या पावसामुळे रोमठे उखडले असल्यामुळे आदिवासी बांधवांचे पुन्हा शेतीचे काम वाढले आहे.तर ही रोपे भाजणीसाठी जमा करण्यात आलेला शेणाचा गोवर, पालापाचोळा भिजल्यामुळे आदिवासी बांधवांना भातरोपाच्या भाजणीचे काम पुढे ढकलावे लागणार आहे.या पावसामुळे या भागामध्ये बराच वेळ विद्युतपुरवठा खंडित झाला होता. आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचे साधन समजल्या जाणाºया हिरड्यांसाठी हा पाऊस जीवदान ठरला आहे. सध्या हिरड्याला नवी पालवी फुटून हिरड्या बहरत आहेत. यामुळे हिरड्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणारा ठरेल, अशी आशा आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटण खोºयातील पाटण या गावामध्ये ग्रामदैवतेची यात्रा असताना पाऊस आल्यामुळे या गावातील आदिवासी बांधवांना पावसामध्येच देवाच्या पालखीची मिरवणूक काढावी लागल्याने या गावातील लोकांच्या आनंदात विरजन पडले.>नारायणगावला हलक्या सरीनारायणगाव परिसरात आज सायंकाळी ७ च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे पाऊस सुरू होता. गुढीपाडव्यानिमित्त तमाशा पंढरीत आलेल्या पाहुण्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या कांदाकाढणीचे काम आणि गव्हाच्या मळणीचे काम सुरू आहे. तोंडावर असलेले पीक पावसात भिजून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर झाला. गुढीपाडव्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या यात्रा कमिटी सदस्य, ग्रामस्थांचीही तारांबळ उडाली. यामुळे सर्वांनी राहुट्यांमध्ये थांबून आश्रय घेतला. जेजुरी परिसरातही संध्याकाळी ७ च्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सकाळपासून शहरात ढगाळ हवामान होते. पाऊस पडण्याची शक्यता होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास वाºयाच्या वेगात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात काही काळ थंडावानिर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेपासून पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.>मुळशी तालुक्यातदमदार हजेरी : पाडव्याच्या मुहूर्तावर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मुळशी तालुक्यात अनेकांची तारांबळ उडाली. गहू, ज्वारी, भाजीपाला उत्पादक शेतकºयांचे नुकसानही झाले. तसेच या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकºयांना बसला. मुळशी तालुक्यात विविध गावांत पडलेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या गहू व ज्वारी पिकांचे तसेच आंबापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच सध्या विविध गावात जत्रांचा हंगाम सुरू आहे. या आकस्मिक आलेल्या पावसाने जत्रेकºयांचीही मोठी धांदल उडाली. गेली आठवडा भर उन्हाच्या व उकाड्याच्या काहिलीने त्रस्त नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.>या अवकाळी पावसाबाबत अधिक माहिती देताना पर्यावरण विषयाचे अभ्यासक धोंडिबा कुंभार यांनी सांगितले की, १९९० मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्या वेळी काही पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांत नदीनाल्यांना पूर आला होता व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच पावसाची आज तब्बल २८ वर्षांनंतर आठवण झाली.

टॅग्स :Rainपाऊस