शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन टंचाईच्या काळातच दूध अनुदानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 02:02 IST

शेतकऱ्यांना अनुदानासाठी ५ महिन्यांपासून प्रतीक्षा : अर्थकारण कोलमडणार, तोडगा काढण्याची मागणी

बारामती : बारामतीच्या बागायती आणि जिरायती भागात देखील शेतीला जोडधंदा म्हणून दूधधंदा केला जातो. दूधधंद्यावर येथील अर्थकारण अवलंबून असते. सलग सहा वर्षांपासून जिरायती भागात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे या भागाला दूधधंद्याने तारले, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, साखर कारखाने बंद झाल्याने उपलब्ध होणारा चारादेखील बंद झाला आहे. शिवाय शासनाने ऐन उन्हाळ्यात टंचाईच्या काळातच फेब्रुवारीपासून अनुदानात घट केली आहे. शिवाय नोव्हेंबर २०१८ पासून शेतकऱ्यांना दुधाचे प्रतिलिटर अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दूधधंद्याबरोबरच ग्रामीण भागात अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना अनुदानासाठी ५ महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या टंचाईग्रस्त स्थितीमुळे शेतकºयांना हिरवा, वाळलेला चारादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकºयांना जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न आहे. जनावरे जगविण्याच्या काळातच दूधदर कमी झाल्याने शेतकºयांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दूध संघांनी प्रतिलिटर २ रुपये वाढ केल्याने दूधदर अनुदान कमी केल्यानंतर देखील ‘जैसे थे’ राहण्यास मदत झाली आहे. उन्हाळ्यात तापमानामध्ये वाढ होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन दूधउत्पादनामध्ये घट होते. बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंतचे अनुदान थकीत आहे. त्यापैकी सुरुवातीच्या ९० दिवसांपैकी ५० दिवसांचे अनुदान मिळाले आहे.२० दिवसांचे अनुदान शेतकºयांना वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लवकरच वितरित केले जाईल. मात्र,यामध्येदेखील हे अनुदान काही शेतकºयांनाच मिळाले आहे. शिवाय १ मार्चपासून शेतकºयांना मिळणाºया प्रतिलिटर अनुदानामध्ये २ रुपये कपात करण्यात आली आहे. दूध पावडरचे दर थोडे वाढले तरी सध्या मंदीचा काळ सुरु आहे. वास्तविक उन्हाळ्यात दूध धंद्यासाठी शेतकºयांना टंचाईग्रस्त भागात चारापाण्यासाठी रोखीने खर्च करावा लागतो. त्यातून दूध उत्पादनाचाच खर्च प्रतिलिटर २० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दूधधंदा परवडत नाही. त्यामुळे शासनाने दूध अनुदान पूर्वीप्रमाणेच प्रतिलिटर ५ रुपये ठेवणे आवश्यक होते. बारामती दूध संघाने शेतकºयांसाठी १ मार्चपासून प्रतिलिटर २ रुपये वाढविले आहेत. त्यामुळे शेतकºयांना शासनाच्या अनुदानासह २५ रुपये प्रतिलिटर दूधदर मिळेल. शासनाने अनुदान वेळेत देणे आवश्क आहे. नोव्हेंबर २०१८ चे अनुदान आता शेतकºयांना देऊन उपयोग होणार नाही. दूधधंदा टिकण्यासाठी शेतकºयांना अनुदानाचे पैसे वेळेत उपलब्ध झाल्यास हा धंदासुरक्षित होईल.नोव्हेंबर २०१८ पर्यंत दुधावरील अनुदान मिळालेले आहे. गेल्या पाच महिन्यांचे अनुदान मिळणे बाकी आहे. तसेच, उन्हाच्या तीव्रतेने दुधाच्या उत्पादनात जवळपास १५ टक्के घट झाली.- संग्राम सोरटे, अध्यक्ष, नवनाथ दूध समूहवास्तविक अनुदान वेळेवर मिळत नसल्याने दूधउत्पादकांचा तोटा होत आहे. एकीकडे उन्हामुळे दूधउत्पादनात घट सहन करावी लागत आहे, तर दुसरीकडे गेल्या ५ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही.- डॉ. रवींद्र सावंत, सावंत डेअरीज प्रा. लि.चे प्रमुखनोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंतचे अनुदान थकीत आहे. त्यापैकी सुरुवातीच्या ९० दिवसांपैकी ५० दिवसांचे अनुदान मिळाले आहे.२० दिवसांचे अनुदान शेतकºयांना वितरित करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेmilkदूध