शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 18:27 IST

आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार

ठळक मुद्देपोलीस ठाण्याची पुनर्रचना; गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार ५ युनिटची स्थापना                  

पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे त्यांच्या तपासासाठी सुसुत्रता यावी, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलीस ठाण्याची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आता गुन्ह्याच्या स्वरुपानुसार ५ युनिटची स्थापना करण्यात आली आहे. गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे सोपविले जाणार आहेत. सध्या एकाच तपास अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जातात. त्याऐवजी आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.हॅकिंग/डाटा चोरी, ऑनलाईन बिझनेस फ्रॉड, चिटिंग फ्रॉड, सोशल नेटवर्किग आणि एटीएम कार्ड फ्रॉड अशी ही पाच युनिट राहणार आहेत.

हॅकिग /डाटा चोरी : डाटा इनस्कीप्ट, मेल हॅकिग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर,ऑनलाईन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्स, फिप्लकार्ड फ्रॉड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिग मोबाईलर फार मनी टॉन्सफर, ऑनलाईन सेल ॲन्ड परचेस फ्रॉड

चिटिंग फ्रॉड : आनलाईन डेटिग साइट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, जाब फ्रॉड, लोन फ्रॉड, पॅकेज टुर फ्रॉड, मोबाईल टॉवर फ्रॉड, मेट्रिमोनियल फ्रॉड आदिसोशल नेटवर्किग : फेसबुक, फेक डॉक्युमेंट, फेसबुब हॅकिग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ आदि

एटीएम कार्ड फ्रॉड : मनी ट्रान्सफर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड फ्रॉड, ओटीपी शेअर फ्रॉड, मोबाईल, लॅपटॉप चोरी, इतरप्रशासन : पोलीस ठाण्याचे सर्व कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलीस ठाण्यांना तांत्रिक सहाय्य.

अशा प्रकारची असणार रचना 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या दिवशी प्राप्त सायबर तक्रारी अर्जाचे युनिटप्रमाणे अधिकाऱ्यांना वाटप करतील. युनिटचे पोलीस निरीक्षक सायबर तक्रारी अर्जाचे पुढील कार्यवाही करता व निर्गती करता त्यांचेकडील सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची, तपासाबाबत तसेच तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत व तक्रारी बाबत चौकशीनंतर व दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेशन करतील.

सायबर पोलीस ठाण्याकडील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अर्जातील फसवणुकीची रक्कम १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, सायबर तक्रारी अर्जास संदर्भात फसवणुक झालेल्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात असेल तर, ज्या सायबर तक्रारी अर्जामधील तक्रार ही डाटा चोरी, सोर्स कोड चोरी, वेब साईट संदर्भातील तक्रारी अशा महत्वाच्या तक्रारी संदर्भात असेल तर अशा तीन महत्वाच्या मुद्द्यावरील तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या बाबत संबंधित सायबर युनिटचे पोलीस निरीक्षक हे कार्यलयीन टिपण्णी ठेवून पोलीस उपायुक्त यांची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करतील. असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीArrestअटक