शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘महारेरा’ प्राधिकरणाच्या बंधनामुळे खरेदी-विक्री व्यवहार रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 13:38 IST

पुणे शहरासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांची प्रचंड अडचण झाली असून, मोठ्या प्रमाणात दस्तनोंदण्या रखडल्या...

ठळक मुद्देमालमत्ता खरेदी-विक्री व करारनामे नोंदणीची अट शिथिल करण्याची ‘क्रेडाई’ची मागणीभूखंड, अपार्टमेंट, बिल्डिंग, फ्लॅट विक्री ,करारनामे, खरेदीखते यांची दस्तनोंदणीस प्रतिबंध नोंदणी महानिरीक्षक व उपनिबंधक कार्यालयात संभ्रम  

पुणे : रेरा प्राधिकरणाकडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील भूखंड, अपार्टमेंट किंवा बिल्डिंग, फ्लॅट यांचे विक्री करारनामे किंवा खरेदीखते यांची दस्तनोंदणी करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांची प्रचंड अडचण झाली असून, मोठ्या प्रमाणात दस्तनोंदण्या रखडल्या आहेत. यामुळे शासनाने रेरा प्राधिकरणाने दस्तनोंदणी संदर्भात घातलेल्या अटी त्वरित शिथिल करण्याची मागणी क्रेडाई यांनी राज्य  शासनाला लेखी निविदानाद्वारे केली आहे. महारेरा प्राधिकरणाच्या आदेशानंतर राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने २० स्पटेंबर २०१९ रोजी स्वतंत्र अधिसूचना काढून रेरा नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील भूखंड, अपार्टमेंट किंवा बिल्डिंग, फ्लॅट यांचे विक्री करारनामे किंवा खरेदीखते यांची दस्तनोंदणी करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. ही अधिसूचना जाहीर करताना काही स्पष्ट आदेश अथवा उल्लेख नसल्याने उपनिबंधक कार्यालयातील अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून नवीन सदनिकांची नोंदणीवर मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. परिणामी, महसूल संकलनामध्ये देखील घट झालेली दिसून येते. एकीकडे नवीन सदनिकेचे हप्ते सुरू आहेत तर, दुसरीकडे दस्तनोंदणी न झाल्यामुळे नवीन सदनिकेचा ताबा मिळत नसून घराचे भाडेदेखील भरावे लागत आहे. त्यामुळे सदनिका ग्राहक हैराण झाला आहे. त्याचबरोबर सदनिकांचे दस्त नोंदवले जात नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना देखील याचा  मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. यामुळेच क्रेडाई महाराष्ट्रने नोंदणी व मुद्रांक विभागाला लेखी पत्र देऊन हा गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच दस्तनोंदणीसाठी घालण्यात आलेली बंधनेदेखील शिथिल करण्याची मागणी केली आहे. याचा  शासनाच्या एक तिमाही महसूल कमी झाला असल्याचा दावा क्रेडाई यांनी केला आहे.  क्रेडाई महाराष्ट्राने अनेक वेळा हा मुद्दा निदर्शनास आणला. परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून आला नाही. याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर तसेच घर खरेदीदारांवरही परिणाम झाला असून, त्याबरोबरच सरकारला होणारा महसूलही तोटा झाला आहे. फ्लॅट खरेदीदारांचे हित लक्षात घेता राज्य शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी क्रेडाई संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. ..........नोंदणी महानिरीक्षक व उपनिबंधक कार्यालयात संभ्रम  क्रेडाई-महाराष्ट्राने महसूल विभागाने दिलेल्या अधिसूचनेवर स्पष्टीकरणाबाबत महारेरा प्राधिकरणाकडे प्रकरण मांडले होते. महारेरा प्राधिकरणाने काढलेल्या परिपत्रकाच्या स्पष्टीकरणासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने २० सप्टेंबर रोजी दुरुस्ती पत्रक काढले आहे. परंतु, या पत्रकानंतर देखील नोंदणी महानिरीक्षक व उपनिबंधक कार्यालयात प्रचंड संभ्रम आहे. परिणाम, सदनिका खेरदी करणाºया ग्राहकांवर होत असून, अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017