राखीपौर्णिमेमुळे एसटीचे ५० हजार प्रवासी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:59+5:302021-08-23T04:14:59+5:30
पुणे: राखीपौर्णिमेनिमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ झाली. रविवारी पुणे विभागात जवळपास ५० हजार अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला. ...

राखीपौर्णिमेमुळे एसटीचे ५० हजार प्रवासी वाढले
पुणे: राखीपौर्णिमेनिमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ झाली. रविवारी पुणे विभागात जवळपास ५० हजार अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी पुणे विभागात जवळपास एकूण दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी एसटी प्रशासनाने २५० अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या.
राखीपौर्णिमेचे औचित्य साधून राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत वाढ होणार. याचा अंदाज पुण्यासह सर्वच आगारांनी व विभागांनी गर्दीचे नियोजन करीत अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने आपल्या १३ आगार प्रमुखांना तशा सूचना देऊन अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यास सांगितले होते.
पुणे एसटी विभागाने पुणे - मुंबई , पुणे - बोरिवली, पुणे - ठाणे , पुणे - नागपूर, पुणे - सोलापूर, पुणे -कोल्हापूर, पुणे - सातारा आदी प्रमुख मार्गांसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जास्त गाड्या सोडल्या. तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या.
-----------
राखीपौर्णिमेनिमित्ताने पुणे विभागाने अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. काही गाड्यांना जवळपास ७५ टक्के इतके भारमान होते.
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे