शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना त्रास

By admin | Updated: August 17, 2015 02:52 IST

श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १५ आॅगस्ट व रविवार तसेच श्रावणातील पहिलाच दिवस अशा दोन दिवस लागून आलेल्या सुटीच्या दिवशी पर्यटकांचा महापूर

भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १५ आॅगस्ट व रविवार तसेच श्रावणातील पहिलाच दिवस अशा दोन दिवस लागून आलेल्या सुटीच्या दिवशी पर्यटकांचा महापूर ओसंडून वाहत होता. भीमाशंकरमध्ये पहिल्यांदाच एवढी गर्दी झाल्याचे स्थानिक दुकानदार सांगत होते. एसटी महामंडळाच्या ढिसाळ व मनमानी कारभारामुळे भाविकांना सुमारे चार किलोमीटर पायी जावे लागले; तसेच अपुरा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे मोजक्या पोलिसांवर ताण आला. शनिवार व रविवार हे दोन दिवस मंचर-भीमाशंकर व राजगुरुनगर-भीमाशंकर हे दोन्ही रस्ते भरून वाहत होते. रस्त्यावर गाडीला गाडी चिकटून चालली होती. मंचर, घोडेगाव, शिनोली, डिंभा, तळेघर, राजगुरुनगर, वाडा, डेहणे या गावांमध्ये वाहतूक कोंडी होत होती. शनिवारी तेरूंगण फाट्यापासून; तर भीमाशंकरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पाच किलोमीटर गाडी काढण्यासाठी सुमारे तीन तास गेले. रस्त्यावर एवढी वाहने होती, की पायी चालणेही यामुळे कठीण झाले होते, तर रविवारी सकाळपासून भीमाशंकरकडे मोठ्या संख्येने वाहने जात होती. सकाळी ११ वाजताच वाहनतळे पूर्ण भरून गेली होती. निगडाळे ते भीमाशंकर हा रस्ता छोटा असल्यामुळे एसटी व मोठ्या लक्झरी गाड्या शिवप्रसाद हॉटेलजवळ थांबवल्या जातील व तेथून एसटी महामंडळाच्या मिनी बसने भीमाशंकरपर्यंत नेले जाईल. संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवार व सुटयांच्या दिवशी एसटी महामंडळ ४० जागा मिनी बस ठेवले, असे बैठकीत नियोजन ठरले होते. मात्र शनिवारी १५ आॅगस्टच्या दिवशी सकाळी एकही मिनी बस येथे आली नाही. त्यामुळे एकच गर्दी झाली. लोकांना चार किलोमीटर पायपीट करीत जावे लागले. संतापलेल्या काही भाविकांनी रस्ता रोखून धरला. सकाळी ११ वाजता दोन मिनी बस आल्या, मात्र या मिनी बस पुरणाऱ्या नव्हत्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी परिस्थितीची कल्पना देऊनही त्यांनी मनमानी केल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, लोकांची रेटारेटी, गर्दी झाली. (वार्ताहर)ह