शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिद्द अन् कठोर परिश्रम यांच्या जोरावर बळीराजाचा मुलगा झाला तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:47 IST

कधी पिकलं नव्हतं तर पिकलं तर विकलं जाईल याची शाश्वती नव्हती..

एमपीएससी परीक्षेत यश : आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवलाजिद्दीच्या जोरावर शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदारशेलपिंपळगाव : आई - वडील शेतकरी, शेतीवरच सगळा चरितार्थ. कधी पिकत नव्हतं, पिकलं तर विकलं जाईल याची शाश्वती नव्हती आणि विकलं गेलं तर चांगला पैसा मिळेल का? याची भ्रांत होती. मात्र अशा विदारक परिस्थितीतही शेतकरी आई - वडिलांनी मुलाच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही आणि मुलानेही जिद्दीच्या जोरावर कठोर परिश्रम करत आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत तहसीलदार होण्याचा पराक्रम केला.                 करंदी (ता.शिरूर) गावातील हेमंत आबासाहेब ढोकले यांची ही यशस्वी परिकथा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी तहसीलदार पद मिळवलं आहे. त्यामुळे करंदी गावामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हेमंतचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर गावातीलच दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कनिष्ठ विद्यालयीन शिक्षण शिरूरमधील विद्याधाम प्रशालेत घेऊन अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.                प्रारंभी काही दिवस एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. मात्र उच्च प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा हेमंतला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. मनात जिद्द, चिकाटी व अभ्यासाची कास धरली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात या शेतकऱ्याच्या मुलानं पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. सिंधुदुर्ग, पालघर व वसई पोलीस ठाण्यात प्रशासकीय सेवा केली. यादरम्यान अभ्यासात कधीही खंड पडू न दिल्याने त्यांनी मुख्याधिकारी पद देखील मिळवलं. लोणंद नगरपालिकेत सन २०१९ पासून ते मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.               दरम्यान श्रेणी एकचे (क्लासवन) अधिकारी होण्याची तीव्र इच्छा उरी असल्याने हेमंत यांनी स्पर्धा परीक्षेचा पुढील अभ्यास सुरुच ठेवला आणि तहसीलदार होऊन ही इच्छा सत्यात उतरवली आहे. हेमंत यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

" तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. अपयशाला पचविण्याची ताकद असेल तर निश्चितच यश मिळू शकते हा माझा अनुभव आहे. आपल्या यशात आई - वडिलांच्या कष्टाचा आणि भाऊ, पत्नी व मित्रांच्या पाठबळाचा मोलाचा वाटा आहे. या पदाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे गोरगरीब जनतेची सेवा करणार आहे. माझा जिल्हाधिकारी होण्याचा मानस आहे.               - हेमंत ढोकले, तहसीलदार

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीFarmerशेतकरी