शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:16 IST

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ ही दिवस उपवास करणा-यांची संख्या खूप मोठी असते

ठळक मुद्देआवक जास्त असल्याने दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची घट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ शेतक-यांनी साठवणुकीतील माल बाहेर काढल्यानंतर साबुदाण्याचे भाव उतरले

पुणे: जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ ही दिवस उपवास करणा-यांची संख्या खूप मोठी असते. यामुळे गेल्या काही दिवसांत मार्केट यार्डातील भुसार बाजारात शेंगदाणा, साबुदाणा, राजगिरा, भगर आदी पदार्थांची मागणी वाढली आहे. यंदा उपवासाच्या पदार्थांचे उत्पादन व आवक देखील चांगली आहे. यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे.     नवरात्र उत्सवाच्या कालावधीत साबुदाणा, भगर, राजगीरा, शिंगाडा, कुट्टु, शेंगदाणा व  त्यांपासून तयार होणा-या पदार्थ्यांना मोठी मागणी असते. बुधवारी  घटस्थापना होत असून,  उपवासाच्या साहित्यांना मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. मार्केटयाडार्तील भुसार बाजारात भगरीची नाशिक, ठाणे तसेच रायगडच्या पट्ट्यामधून दररोज सात ते दहा गाड्या आवक होत आहे. तर, तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातून साबुदाण्याच्या १० ते १२ गाड्या, कर्नाटक, गुजरात आणि राज्याच्या विविध भागातून गुजरात जाडा, कर्नाटक घुंगरू आणि स्पॅनिश आदी शेंगदाण्याच्या प्रकाराच्या १० ते १५ गाड्ड्या बाजारात दाखल होत आहे. उत्तर भारतातूनही शिंगाडा, कुट्टु आदी पदार्थांची मोठी आवक वाढत आहे.         याबाबत व्यापारी महेश गांधी यांनी सांगितले की,  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भावात पंधरा टक्कयांनी घट झाली आहे. मागील वर्षी भगरीला प्रतिकिलो शंभर रुपये भाव मिळाला होता. तर, काही दिवसांपुर्वी साबुदाण्याचे भावही तेजीत असल्याचे दिसत होते. मात्र, शेतक-यांनी साठवणुकीतील माल बाहेर काढल्यानंतर साबुदाण्याचे भाव उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांची आवक कायम असल्याने त्याचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालिपीठ तयार करण्यासाठी भाविकांकडून भगरपीठ, राजगीरापीठ, साबुदाणापीठची खरेदी करण्यात येत आहे. येथील घाऊक बाजारात राजगीरा पीठाला १८० रुपये, साबुदाणा पीठ १४० रुपये, भगरपीठ १६० रुपये, शिंगाडा पीठ ४०० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. 

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीMarketबाजार