मंचर : भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो. परंपरागत असे स्वरूप व उच्च-नीचतेची भावना ही यांची वैशिष्ट्ये. अशा विषमतापूर्ण समाजात लोकशाही रुजवण्याचे फार मोठे आव्हान आपल्यासमोर होते व आहे, असे मत घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी व्यक्त केले.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही या विषयावर अर्धदिवसीय कृती सत्राचे आयोजन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. या वेळी व्यासपीठावर घोडेगाव वकील संघटनेचे खजिनदार अॅड. नवनाथ निघोट, डॉ. लक्ष्मणराव घोलप, प्रा. तानसेन रणदिवे उपस्थित होते. कृती सत्रातील दुसऱ्या सत्रात बोलताना अॅड. नवनाथ निघोट लोकशाहीचे सामर्थ्य व सद्यस्थिती विषयी म्हणाले, लोकशाही राज्यात व्यक्तीच्या हक्कांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकशाहीचे यशापयश त्या देशातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे, यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात, देशात स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबर त्यांच्या कर्तव्याची जाणीवही वेळोवेळी करून देणे, असणे हे लोकशाही खोलपर्यंत रुजविण्याचे प्रमुख तत्त्व आहे. प्रास्ताविक प्रा. ताणसेन रणदिवे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. भाऊसाहेब सांगळे व प्रा. वैशाली सुपेकर यांनी केले. आभार प्रा. संतोष जाधव यांनी मानले. प्रा. गणेश आवारी, प्रा. एस. व्ही. पिंजारी, प्रा. सचिन मोरे यांनी नियोजन केले.प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, भारतीय समाज केवळ विविधतापूर्ण असे नाही तर तो विषमतेवर आधारलेला आहे. कृती सत्राच्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुमरे ८० विद्यार्थ्यांन उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विषमतेमुळे लोकशाही रुजवणे कठीण : जाधव
By admin | Updated: February 23, 2017 02:06 IST