शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबईदरम्यानच्या अनेक गाड्या साेमवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 21:44 IST

मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. साेमवारी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे : मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. काही गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, सोमवारीही काही गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे संपुर्ण रेल्वे वाहतुक कोलमडून गेली आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने सर्व रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. बहुतेक गाड्यांनी तीन ते साडे तीन तासांचा विलंब लागत होता. त्यातच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मंकी हिल जवळ घाटात रेल्वेमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतुक बंद करावी लागली. परिणामी बहुतेक गाड्या कल्याणहून नाशिक मार्गाने वळविल्या. कसारा घाट परिसरातही जोरदार पावसाने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे बहुतेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्या. मुंबईतून पुणे व नाशिककडे जाणारी रेल्वे वाहतूक शनिवारी रात्रीपासून खोळंबली. 

रविवारी दिवसभरही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही. त्यामुळे रविवारीही मुंबईच्या दिशेने जाणाºया अनेक गाड्या रद्द केल्या. तर अनेक लांब पल्याच्या गाड्या पुणे, नाशिक किंवा इगतपुरीपर्यंतच धावत होत्या. तसेच कसारा घाटात रेल्वेमार्गावर सातत्याने गाळ येत होता. कसारा स्थानकात रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने नाशिककडे जाणाºया गाड्या खोळंबून राहिल्या. त्यामुळे मुंबईकडे ये-जा करणाºया प्रवाशांचे हाल झाले. त्यांना बस किंवा इतर खासगी वाहनांनी पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

सोमवारी रद्द केलेल्या रेल्वेगाड्या - मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस- मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर- मनमाड-मुंबई-मनमाड एक्सप्रेस- भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस- पुणे-बिलासपुर एक्सप्रेस- एलटीटी-हातिया एक्सप्रेस--------------रविवारी मुंबई ते पुणेदरम्यान अंशत: रद्द रेल्वेगाड्या -- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस - एलटीटी-विशाखापट्टण्णम एक्सप्रेस - मुंबई-चेन्नई एक्सप्रेस- पनवेल-नांदेड विशेष - एलटीटी -काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस- मुंबई-चेन्नई मेल- एलटीटी -कोईम्बतुर एक्सप्रेस - मुंबई-भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस- मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस (मुंबई-दौंडदरम्यान रद्द)- मुंबई-बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (मुंबई- सोलापुरदरम्यान रद्द)- मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस (मुंबई -नाशिकदरम्यान रद्द)- जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस (मुंबई -इगतपुरीदरम्यान रद्द)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRainपाऊस