धुक्यामुळे कांद्याला रोगराईचा धोका, जिल्ह्यात काही भागात प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:34 IST2017-12-10T01:34:05+5:302017-12-10T01:34:13+5:30
भामचंद्र डोंगर परिसरातील गावात शनिवारी सकाळी ७ ते ८ दरम्यान दाट धुक्याने हजेरी लावली. परंतु याचा परिणाम कांदा पिकावर रोगराई वाढण्यास होणार असल्याची चिंता शेतक-यांनी व्यक्त केली.

धुक्यामुळे कांद्याला रोगराईचा धोका, जिल्ह्यात काही भागात प्रादूर्भाव
आसखेड : भामचंद्र डोंगर परिसरातील गावात शनिवारी सकाळी ७ ते ८ दरम्यान दाट धुक्याने हजेरी लावली. परंतु याचा परिणाम कांदा पिकावर रोगराई वाढण्यास होणार असल्याची चिंता शेतक-यांनी व्यक्त केली.
यंदा आजपर्यंत वेळी अवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आॅक्टोबर हीट व नोव्हेंबर , डिसेंबरमधील थंडीही गायब झाली. गहू, हरभरा यासाठी आवश्यक असणारी थंडीही पिकांना अवेळी पावसामुळे मिळाली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील सगळी पिके सध्या धोक्यात असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी महादू लिंभोरे पाटील यांनी सांगितली. आज सकाळी वराळे, भांबोली, शेलू, आसखेड, वासुली, आंबेठाण परिसरात धुक्यामुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.
कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चिंता शेतकºयांनी व्यक्त केली.
धुक्यामुळे शेतकरी त्रस्त
महुडे : भोर तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. आता हिवाळ्यामध्ये दाट धुके पडत असल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली.
या परिसरात जवळचे काही दिसत नव्हते. महुडे खोºयाला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून
काढले होते. हातातोंडाशी आलेल्या भातपिकावरील रोगाने शेतकºयांना चांगलाच फटका बसला. त्यामध्ये शेतकरी सावरतो ना सावरतो तोच अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले.
रब्बी पिकाच्या पेरण्या केल्यानंतर पिके जोमदार दिसू लागली . त्यात गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके पडू लागले. यामुळे गहू, हरभरा या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला. हरभरा या पिकावर आळी दिसू लागली आहे. रोगाचे धुके असणार, अशी चर्चा शेतकरीवर्गात आहे.