शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:36 IST

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.येथील तांबेवस्ती, रांजणगाव सांडस परिसरातील कामठेवाडी, शिंदेवस्ती, पठार भाग आंधळगाव, न्हनावरे, उरळगाव, कोळपेवस्ती त्याचप्रमाणे नागरगावचा काही भाग या भागांमध्ये दुष्काळाची दाहकता खूप वाढलेले भागात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.आलेगाव पागामध्ये पाणी साठवण्याची शेंडगेवाडी तलाव तांबेवस्ती तलाव तीन वर्षांपूर्वी आटल्यामुळे या भागात जनावरांच्या व शेतीच्या पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात दिवसाकाठी दहा ते बारा बोअरवेल घेऊन पूर्णपणे बोअरवेलचा धुरळा निघालेला असून हिवाळ्यात पिकांचा उन्हाळा झालेला आहे. शेतातील पिके दिवाळीनंतरच संपलेली असून या भागात पिके पाहायला मिळत नाही.एका बोरवेल साठी साधारणपणे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च येत आहे 70 रुपये ते 65 रुपये फूट या दराप्रमाणे बोरवेल मशीन चे एजेंट शेतकरी वर्गाकडून पैसे उकळत असल्याची वस्तुस्थिती आहे साधारणपणे पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत आहे परंतु पाणी न लागल्यामुळे शेतक?्यांच्या डोक्?यावर कजार्चा डोंगर अजूनही मोठा होता आधीच पिके जळून गेल्याने सोसायटी कर्ज व इतर कडून घेतलेले पैसे यांचाही डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असून या भागामध्ये चासकमानचे आवर्तन लोकप्रतिनिधींनी सोडले तर या भागात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते.आलेगाव पागा परिसरात दिवसाकाठी एक-दोन बोअरवेल होत असून या बोअरवेल पूर्णपणे रिकामा जात आहे. पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या भागामध्ये तसेच शिरूरच्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये बोअरवेल मशीन पाणी पाहणारा पाणाड्या शेतकरी आणि धुरळा हे समीकरणच जणू जुळलेले दिसत आहे. पाणी लागत नाही व शेतकरी बोअर घेतल्याशिवाय राहत नाही. बोअर केल्यानंतर शेतकºयाला वीस ते पंचवीस हजार रुपयांचा या दुष्काळाच्या परिस्थितीतही कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता मोठी असून लोकप्रतिनिधींनी पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ही नागरिकांची मागणी आहे.उरळगाव ,नावरे कोळपे वस्ती या परिसरात चासकमान च्या पाण्याचे आवर्तन येऊन गेल्यामुळे विहिरी बोरवेल यांच्या पाण्यासाठी थोडीशी वाढ झालेले आहे परंतु जानेवारीनंतर या भागात टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते- अशोक कोळपे, युवा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे