शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीच्या खंडेरायावर भीषण दुष्काळाची छाया ; टॅंकरने पाणी आणून घातले स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:15 IST

सदानंदाचा येळकोट..येळकोट जयमल्हार च्या गजरात भाविकांनी सोमवारी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनाला अलोट गर्दी केली.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमावास्येनिमित्त मोठी यात्रा भरली आहे. राज्यभरातून आलेल्या सुमारे २ लाख भाविकांनी कुलदेवतच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सदानंदाचा येळकोट.. येळकोट जयमल्हार च्या गजरात भाविकांनी सोमवारी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनाला अलोट गर्दी केली. पण खंडेरायालाही भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. त्यांच्या स्नानासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. 

सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाल असल्याने सकाळी ८ वाजता पालखी सोहळ्याची कऱ्हा  स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. पेशव्यांच्या इशारतीने खांदेकरी, मानकरी भाविकांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली, मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले  यावेळी गडकोटात मोठ्या प्रमाणावर भांडार खोबऱ्याची उधळण करण्यात येत होती. सोहळ्यातील उपस्थित प्रत्येक भाविक भारावलेल्या अवस्थेत देवाचा जयघोष करीत होता.सोहळा मुख्य नंदी चौकातून शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीने कऱ्हा स्नानासाठी निघाला होता. पालखी मार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी भाविकांची गर्दी होती. भाविक सदानंदाच्या जयघोषात भांडार खोबऱ्याची उधळण करीत देवदर्शन उरकत होते.सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सोहळा कऱ्हे काठी पोहोचला. याठिकाणी विधिवत उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी टँकरने पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राdroughtदुष्काळWaterपाणी