शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घाण पाण्यामुळे शेती होतेय नापिक

By admin | Updated: June 12, 2014 05:15 IST

हिंजवडी, आयटीनगरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगात प्रसिद्ध आहे. या नामांकित आयटी हबमधील काही कंपन्या माणमधील अन्नदात्याच्याच मुळावर उठल्या आहेत.

वाकड : हिंजवडी, आयटीनगरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगात प्रसिद्ध आहे. या नामांकित आयटी हबमधील काही कंपन्या माणमधील अन्नदात्याच्याच मुळावर उठल्या आहेत. कंपनीचे मैलामिश्रित पाणी थेट शेतात सोडले जात असल्याने जमीन नापीक होत असून शेतकरी हतबल झाले आहेत. आयटी अधिकारी कसलीच दाद देत नसल्याने गेल्या ३ वर्षांपासून हा त्रास सहन करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच आयटी पार्कमुळे संपूर्ण जमीन संपादित झालेली असताना राहिलेली तोकडी जमीन तरी सुखाने कसू द्या, अशी विनवणी ते करीत आहेत. हिंजवडी फेज तीन मधील जुनी डीएलएफ अन् आताची क्वॉडरन ही सुमारे ४० एकरात वसलेली आयटी कंपनी आहे. कंपनी कॅम्पसमध्ये अद्ययावत अन् झगमगाटातील मोठ-मोठे पाच टप्पे आहेत. येथे हजारो अभियंते आणि कामगार काम करतात. मात्र, कंपनीचे ड्रेनेज समोरील थेट शेतीत सोडण्यात आले आहे. हे दुर्गंधीयुक्त, दूषित अन् मैलामिश्रित पाणी येथील १५ एकर शेती पट्ट्यात पसरते. सखल भागात तर गुडघाभर पाणी साचते. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. १५ एकराच्या पट्ट्यात माणवासीयांची शेतजमीन आहे. येथे पावसाळ्यात भात तर हिवाळ्यात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. मात्र, शेतीत सातत्याने दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने शेतीत दलदल झाली असून शेतकऱ्याला जाणे-येणे अशक्य झाले आहे. तर अनेकांना या मैलामिश्रित पाण्याने हाता-पायाला त्वचारोग जडले आहेत. भात पेरणीसाठी आधी शेतीची मशागत करावी लागते. मात्र, या दूषित पाण्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. मान्सूनला कधीही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे पेरणी कशी होणार, याची चिंता आहे. एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गेटवर ते पाणी आमचे नाही, तसेच तुमचा आमचा संबंध नाही, तुम्ही आमदार, खासदार कोणाकडेही काय करायचे ते करा, असे त्याने सुनावले. याबाबत या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते सुधीर नागे म्हणाले, ‘‘काही लोकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. मी शुक्रवारी आमच्या काही उपअभियंत्यांना घेऊन त्या जागेची पाहणी करणार आहे. पाणी नेमके किती येते कुठून येते, या सर्वांची पाहणी करून नंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यावर लवकर उपाय योजना करणार आहे.’’(वार्ताहर)