शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

पुलं मानधनाच्या विलंबामुळे चित्रपटसृष्टीत रमले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 18:24 IST

पैसे बुडविण्याची वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे..

ठळक मुद्देपरिसंवादातून पुलंचे चित्रसृष्टीपासून दूर राहण्याचे वास्तव उलगडलेआपणहून मानधन मागण्याचे पुलंना कधीच धाडस झाले नाही

पुणे : पुलंनी साहित्य, रंगभूमीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. १९४८ ते ५२ या काळात पुलंच्या नावावर १९ चित्रपट होते. मात्र, मराठी चित्रपट सृष्टीत मानधन मिळण्याबाबत होणा-या विलंबामुळे पुलं चित्रपट सृष्टीत फार काळ रुळले नाहीत. आपणहून मानधन मागण्याचे पुलंना कधीच धाडस झाले नाही. पैसे बुडविण्याची वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे, अशा संवादसूरामधून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल देशपांडे यांचे चित्रसृष्टीपासून दूर राहाण्यामागचे वास्तव उलगडले.   ‘पु.ल.परिवार’आणि आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि स्क्वेअर १च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात 'चित्रपट नाटकातील पु.ल.' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माधव वझे, आनंद माडगूळकर, आणि किरण यज्ञोपवीत सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. माधव वझे म्हणाले,  जागतिक स्तरावर ज्या ज्या दर्जेदार कलाकृती दिसल्या त्या त्या त्यांनी मराठीमध्ये आणल्या हे त्यांचे देणं आहे. ' तुझं आहे तुझपाशी' स्वत:बद्दलचा गोंधळ आहे. ' मी कोण ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तर ' ती फुलराणी' हे विनोदी नाटक नाही ती शैली आहे ते एक भाषिक सत्ताकारण आहे. ते त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर खेळवले. प्रत्येक नाटकाची संगती लावताना पुलंना राजकीय धारणा नव्हती. पुलंनी लेखनातून कुणाला अडचणीत आणले नाही निखळ विनोद,भाषेची शब्दसंपदा प्रयोगक्षम नाटके दिली.  मध्यमवर्गीय समाजाने ' तीन पैशाचा तमाशा' कडे दुर्लक्ष केले..पुलंनाही ते बसवलेले नाटक पटले नव्हते. आनन्द माडगूळकर यांनी पुलंच्या चित्रपट कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,  चित्रपट अभिनेता म्हणून पुलं प्रकाशझोतात आले तो चित्रपट म्हणजे ' वंदे मातरम'. संवादातल्या वेगळ्या पातळीची गदिमा आणि पुलंना उपजत जाण होती. संवाद विशिष्ठ लकबीमध्ये  उच्चारणं तरीही त्यांच्यात स्पष्टता असणं ही पुलंच्या लेखनाची खासियत होती.  त्याकाळात मराठी चित्रपटांमध्ये मारामारीचे प्रसंग किंवा नृत्य पाहणे  म्हणजे शिक्षा असायची. पडद्यावरची मारामारी खरी वाटावी असा आभास निर्माण व्हायला हवा. मात्र तसे कधीच दिसले नाही. किरण यज्ञोपवित  यांनी बिन पैशाचा तमाशा' मधून एका वेगळ्या फॉर्ममध्ये  पाहाता आले.  पण हे नाटक सादर करताना जो रंगमंचीय अवकाश आणि कलाकार हवेत ते मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेP L Deshpandeपु. ल. देशपांडेcinemaसिनेमा