शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

लोकसंख्या ठरविताना महापालिकेचा होतोय गोंधळ, पाणी नियोजन अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:45 IST

महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे.

- विशाल शिर्केपुणे : महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात लोकसंख्येचे वेगवेगळे दावे करण्यात आले असून, महापालिकेच्या सुधारित दाव्यानुसार शहर, कॅन्टोन्मेंट आणि परिसरातील लोकसंख्या ४८ लाखांवर आहे. जरी शहराची लोकसंख्या पन्नास लाख गृहित धरली तरी, सध्याच्या सूत्रानुसार साडेचौदा अब्ज घनफुटांपेक्षा (टीएमसी) अधिक पाणी शहराला देता येणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे पाणी नियोजन अटळ असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे.सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे शहराला लोकसंख्येनुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणीवापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला.जलसंपदा विभागाने देखील महापालिकेला २० डिसेंबरला पत्र पाठवून ८९२ एमलडी पाणी उचलण्यास सांगितले. तसेच सध्याचा पाणीवापर १३५० एमएलडी असून, तो मंजूर पाणी कोट्यापेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.महापालिकेने सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या शपथपत्रानुसार शहराची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार ७६३ इतकी असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १ लाख ५८ इतकी आहे. सध्याच्या लोकसंख्या वाढीनुसार २०२२ पर्यंत ४४ लाख ३० हजार आणि २०३२ पर्यंत ५७ लाख ७१ हजार लोकसंख्या होईल. त्यानुसार २०३२ साली शहराला १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.जलसंपदा विभागाने कालवा समितीचा हवाला देत ११.५०टीएमसी पाणीवापर करण्यास सांगितले आहे. शहर आणि कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या ४० लाख ७६ हजारावर आहे. त्यात आणखी दहा लाख लोकसंख्येची भर पडली तरी साडेअकरा टीएमसीच्या सूत्रानुसार फारतर १४.५० टीएमसीच पाणी मिळेल.लोकसंख्या ठरविताना महापालिकेचा उडतोय गोंधळमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला दिलेल्या शपथपत्रात महापालिकेने जून २०१७ मध्ये शहराची लोकसंख्या ३९,१८,७७३ असल्याचे सांगितले. १७ आॅक्टोबर २०१७ रोजी कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या १,५८,०११ अशी शहर-ग्रामीण ३९ लाख १८ हजार ७७३ अशी मिळून ४० लाख ७६ हजार ७७४ लोकसंख्येचा दावा.२२ नोव्हेंबर २०१८ रोजी शहर, कॅन्टोन्मेंट आणि परिसराची लोकसंख्या ४८ लाख १० हजार २८३ असल्याचे नमूद केले आहे.ग्रामपंचायती घेतात महापालिका आणि जलसंपदा विभागाकडूनही पाणीमहापालिकेने कळविलेल्या एकूण लोकसंख्येत २१ ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येचा देखील समावेश आहे. त्यातील काही ग्रामपंचायती या जलसंपदा विभागाकडूनदेखील पाणी घेतात.अशा ग्रामपंचायतींची तपासणी महापालिका आणि जलसंपदा विभागाला संयुक्तपणे करावी लागेल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी