मृत्यूंजयदूतांमुळे अपघातग्रस्तांना वेळीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST2021-03-30T04:07:46+5:302021-03-30T04:07:46+5:30
वालचंदनगर: मृत्यूंजय दूतांमुळे अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळेल. एखादा जीव वाचला तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद मृत्युंजय दूताला लाभेल, ...

मृत्यूंजयदूतांमुळे अपघातग्रस्तांना वेळीच
वालचंदनगर: मृत्यूंजय दूतांमुळे अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळेल. एखादा जीव वाचला तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद मृत्युंजय दूताला लाभेल, असे मत वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुठेकर यांनी व्यक्त केले.
वालचंदनगर येथील सभागृहात मृत्युंजय दूतांची बैठक घेण्यात आली. या वेळी डॉ. विकास शहा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करणे म्हणजे यमदूतापासून वाचवणारे मृत्युंजय दूत हेच खऱ्या अर्थाने देवदूत असल्याचे मत डॉ. विकास शहा यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड यांनी मृत्युंजय दूतांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. यावेळी विजय कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वालचंदनगर येथील सभागृहात मृत्युंजय दूतांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले
२९०३२०२१-बारामती-०४