सिंहगडावर पर्र्यटकांची गर्दी
By Admin | Updated: August 17, 2015 02:25 IST2015-08-17T02:25:42+5:302015-08-17T02:25:42+5:30
स्वातंत्र्य दिन व आलेल्या सलग २ सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किल्ले सिंंहगडावर मोठी गर्दी केली. त्यामुळे वनसंरक्षण समिती व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक

सिंहगडावर पर्र्यटकांची गर्दी
सिंहगड रस्ता : स्वातंत्र्य दिन व आलेल्या सलग २ सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किल्ले सिंंहगडावर मोठी गर्दी केली. त्यामुळे वनसंरक्षण समिती व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोठी धांदल उडाली.
वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक विजय माने यांनी वन कर्मचाऱ्यांना घाटातील कोंडी टाळण्यासाठी नियोजनाचे आदेश दिले होते. मात्र, पर्यटकांची प्रचंड संख्या, पावसामुळे नवीन विस्तारीत वाहनतळावर झालेल्या चिखलामुळे येथे वाहने पार्क करता येत नव्हती. गोळेवाडी तपासणी नाका, कोंढणपूर फाटा परिसरात शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्वातंत्र्यदिनी झालेल्या गर्दीमुळे घाटरस्ता अनेक वेळा बंद करावा लागला. शनिवारी तपासणी नाक्यावर १ हजार ९४६ दुचाकी, ३५४ चारचाकी वाहनचालकांकडून उपद्रवशुल्क जमा करण्यात आले. हवेली पोलिसांनी धडक कारवाई करून प्रथमच विक्रमी दंड वसूल केला.
खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्यात उतरता आले नाही. म्हणूनच पर्यटकांनी सिंंहगड व पानशेतकडे आपला मोर्चा वळविला होता. तीनच दिवसांपूर्वी चारचाकी दरीत कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. (वार्ताहर)