शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भीक नको पण उभारी देण्यासाठी मदत करा, डीएसकेंचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 20:17 IST

माझ्यासाठी दिला जाणारा हा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा असेल,​​​​​​​ डीएसके हा माणूस फसवणार नाही हे लोकांना माहीत आहे.

पुणे :  मला भीक नको पण पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करा असं भावनिक आवाहन अडचणीत सापडलेले सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. उच्च न्यायालयात 50 कोटी रुपये जमा करण्यात डी. एस. कुलकर्णी यांना अपयश आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार काल पोलिसांनी डीएसके दांपत्याची 5 तास चौकशी केली. ही चौकशी दररोज सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या दरम्यान आणखी 4 दिवस सुरु राहणार आहे़​​​​.

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत डीएसकेंनी अमेरिकेच्याधर्तीवर क्राऊड फंडिंगमधून निधी जमा करुन लोकांचे पैसे परत करणार असल्याची माहीती दिली. त्यासाठी क्राउड फंडिंग सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. आपल्यासाठी दिला जाणारा हा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा असेल असंही डीएसके यावेळी म्हणाले. लहानपणीच्या आठवणी सांगताना डीएसके हा माणूस फसवणार नाही हे लोकांना माहीत असून लोक आपण होऊन मदतीचा हात पुढे करीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म अशा लोकांना उभा करून देत आहे. या द्वारे निर्माण होणाऱ्या फंडातून मी पुन्हा उभारी घेईन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात याच फंडातून माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देईन असे ते म्हणाले.

रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असे मुंबई हायकोर्टाने डी. एस. कुलकर्णी यांना बजावलं आहे. तसेच, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 4 हजार 20 ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहेत. ठेवींची रक्कम 280 कोटी 58 लाख 56 हजार 588 रुपये इतकी आहे.

 

 

 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेPoliceपोलिस