पारोडीत दारूच्या नशेत युवकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST2021-04-17T04:09:44+5:302021-04-17T04:09:44+5:30

अक्षय टेमगिरे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे, तर किरण प्रभाकर चव्हाण व पोपट प्रभाकर चव्हाण असे गुन्हे ...

Drunk youth beaten to death in Parodi | पारोडीत दारूच्या नशेत युवकाला बेदम मारहाण

पारोडीत दारूच्या नशेत युवकाला बेदम मारहाण

अक्षय टेमगिरे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे, तर किरण प्रभाकर चव्हाण व पोपट प्रभाकर चव्हाण असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय टेमगिरे हा त्याच्या दुचाकीवरून (एम एच १२ क्यू व्ही ०३६३) त्याचा मित्र गोटूराम टेमगिरे याला सोडविण्यासाठी निघाला होता. जाताना वाटेत शाळेजवळील सिमेंटच्या रस्त्यावर किरण चव्हाण हा युवक दारूच्या नशेत झोपलेला होता. या वेळी गोटुराम याने किरणला उठवून रस्त्यावर झोपू नकोस गाड्या येतात असे म्हणाला व त्याला बाजूला बसविले. काही वेळाने अक्षय हा गोटूरामला सोडून परत येत असताना किरण याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून अक्षय व किरण या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर किरणचा भाऊ पोपट देखील त्या ठिकाणी आला आणि त्यानेदेखील अक्षयला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरवात केली. अक्षयच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

याबाबत संजय बाळासाहेब टेमगिरे (वय ४५, रा. पारोडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

Web Title: Drunk youth beaten to death in Parodi