शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खिशात चपटी अन् OLA चा ड्रायव्हर! गोपीचंद पडळकरांनी व्हायरल केला पुण्यातील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:18 IST

'मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय.'

पुणे: देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये ओला-उबेर इत्यादी ऑनलाइन टॅक्सी बुकींगचा मोठा प्रमाणात वापर होते. महाराष्ट्रातील मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये याचा सर्रास वापर होतो. आरामदायी प्रवासासाठी लोक अशा टॅक्सींची बुकींग करतात. कंपन्यांनी चारचाकी टॅक्सीसोबतच आता मोटारसायकलवरुन प्रवाशांना सोडण्याची सोयदेखील केली आहे. पण, कधीकधी हा प्रवास आपल्या जीवावर बेतू शकतो. अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली आहे..

पुण्यात ओला कंपनीची बुकींग घेणाऱ्या एका मोटारसायकल चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या फेसबूकवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका प्रवाशाला घेण्यासाठी आलेला चालक दारुच्या नशेत आढळून आलाय. तसेच त्याच्या खिशातही देशी दारुची बाटली आढळल्याने अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

'मद्यधुंद सरकारपण प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय'गोपीचंद पडळकर व्हिडिओ शेअर करत म्हणतात, 'ओला, उबेर, रेपिडो, झूम अशा ॲपचा वापर करुन सर्रास अवैधरित्या दुचाकी टॅक्सी म्हणून दुरूपयोग केला जातोय. मात्र हजारोचा टॅक्स भरणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारली जातेय. परिवहन मंत्री अनिल परब व पालकमंत्री अजित पवार हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का?' असा सवाल पडळकर यांनी विचारला आहे.

स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओकाही स्थानिक तरुणांनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढला असून, याबाबत त्यांनी सरकार आणि अजित पवारांना जाबदेखील विचारला आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मी ओलाचा चालक असून, प्रवाशाला घेण्यासाठी आल्याचे सांगत आहेत. तसेच, मी दारुन पिऊन आलोय, असेही तो यावेळी सांगत आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :PuneपुणेOlaओलाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर